Murder

प्रेयसीकडून प्रियकराची वार करून हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

897 0

पुणे : पुणे (Pune) शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी ही वाढत असून प्रेम प्रकरणातून अनेक घटना घडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील वाघोली येथे एक धक्कादायक प्रकार घडला असून प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात किरकोळ झालेल्या भांडणात प्रेयसीने प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. यशवंत महेश मुंडे ( वय 20) (Yashwant Mahesh Munde) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे तर अनुजा महेश पणाळे (Anuja Mahesh Panale) असे खून केलेल्या प्रेयसीचे नाव आहे. पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की पुण्यातील वाघोली येथे हे प्रियकर आणि प्रेयसी दोघेही काही दिवसांपासून भाड्याच्या खोलीत राहत होते. ते वाघोली येथील एका महाविद्यालयात शिकत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दोघेही एकत्र राहत होते.आज पहाटेच्या सुमारास यशवंत महेश मुंडे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याच आढळला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी तात्काळ धाव घेत घेतली. याबाबत प्रथम दर्शनी अस वाटत आहे की प्रेयसी अनुजा महेश पणाळे हिने घरात भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकराच्या सर्व अंगावर वार केल्याचे दिसून येत आहे. मुंडे याला जेव्हा सकाळी रुग्णालयात हलवले तेव्हा त्याचा उपाचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्या दोघांच्या भांडणात आरोपी प्रेयसी ही देखील जखमी झाली असून तिचा शोध देखील पोलिसांकडून सुरू आहे.

धक्कादायक कारण आले समोर
या हत्या प्रकरणाचा आता उलगडा झाला आहे. गेल्या एक वर्षांपासून यशवंत आणि अनुजा हे एकमेकांना ओळख होते. मात्र यशवंत हा तिला सारखा त्रास देत होता. तिच्यावर संशय घेत होता. यावरुन दोघांचे मोठे भांडण झाले. आणि रागाच्या भरात आरोपी प्रेयसीने प्रियकरावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करुन हत्या केली. यानंतर तिने आपल्या हाताची नस कापून घेतली. घाबरलेल्या अवस्थेत बाहेर बाकावर येऊन बसली. हा सगळा प्रकार वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी पाहिला. त्यावेळी तिचं प्रचंड प्रमाणात रक्त गेलं होतं. तिची अवस्था पाहून वसतीगृहातील मुलांनी तिला दवाखान्यात दाखल केले. यामुळे तिचा जीव वाचला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. यावेळी तिने मृत प्रियकर हा आपल्याला मानसिक त्रास देत होता. त्यातून हा प्रकार घडल्याचे कबूल केले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Dasra

Punit Balan : पुनित बालन यांच्या सहयोगाने केपीएसएसने काश्मीर खोऱ्यात साजरा केला जातीय सलोख्याने दसरा

Posted by - October 26, 2023 0
पुणे : काश्मिरी पंडित संघर्ष समिती (केपीएसएस) ने यंदाच्या दसरा उत्सवात खोऱ्याला एकता आणि जातीय सलोख्याच्या अनोख्या रंगांनी उजळून टाकले.…
Harshvardhan Patil

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Posted by - February 16, 2024 0
पुणे : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil)…

शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना ठेवले डांबून; पुण्यातील ‘या’ शाळेतील धक्कादायक घटना

Posted by - January 19, 2023 0
वाघोली : वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलची फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर डांबून ठेवल्याप्रकरणी पालकांनी व मनसे पदाधिकारी यांनी…
Railway Accident

Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात

Posted by - March 18, 2024 0
अजमेर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अजमेरमध्ये भीषण रेल्वे अपघात (Railway Accident) झाला आहे. मालगाडीला धडकल्यानंतर साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे चार…

24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी कधी पाहिली आहे का ? किंमत वाचून तुम्हीही व्हाल चकित

Posted by - May 2, 2023 0
आतपर्यंत मँगो, पिस्ता, चॉकलेट फ्लेवरच्या कुल्फी आपण ऐकल्या असतील पण सोन्याची कुल्फी आणि त्यातही 24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी असं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *