Lonavala Accident

Lonavala Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर धावत्या कंटेनरचा टायर फुटून भीषण अपघात

6780 0

मुंबई : पुण्यातील जुन्नर तालुक्यात भीषण अपघाताची बातमी ताजी असतानाच आता मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात (Lonavala Accident) घडला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेरनचा टायर फुटल्याने अपघातग्रस्त वाहन डिव्हायडर तोडून शेजारच्या लेनमध्ये शिरला आणि हा भीषण अपघात झाला. लोणावळा शहराजवळ हा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु या अपघातामुळं मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

कसा घडला अपघात?
मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने सुटलेल्या एका कंटेनरचं अचानक टायर फुटलं. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यानजीक हा अपघात झाला आहे. टायर फुटल्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जावून धडकला. यानंतर तीन ते चार वाहनं एकमेकांना धडकली. या घटनेत कंटेनरसह अन्य काही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ इजा झाली असून त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात झाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघातग्रस्त वाहन मार्गावरून हटवण्याचं काम सुरू करण्यात आले.

Share This News

Related Post

“आमदारांना घरे मोफत नाही, तर पैसे मोजावे लागणार… .” जितेंद्र आव्हाडांनी सांगितली किंमत

Posted by - March 25, 2022 0
मुंबई- मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली. या घोषणेनंतर सर्वच स्तरातून…
Nasik

लग्नावरून परतताना कार नदीत कोसळून भीषण अपघात; चिमुकलीसह 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 30, 2023 0
नाशिक : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या नांदगाव-मालेगाव मार्गावर हा…
Accident News

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Posted by - January 8, 2024 0
हिंगोली : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण खूप वाढले आहे. राज्यात सध्या एसटी अपघाताची मालिका सुरूच आहे. प्रवाशांनी भरलेली…
Chandrapur Accsident

भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी जाताना बहिणीचा वाटेत दुर्दैवी मृत्यू; बापाच्या डोळ्यादेखत सोडला जीव

Posted by - June 18, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी जाताना बहिणीचा वाटेत मृत्यू झाला आहे. बल्लारपूर…
Double Murder Case

Double Murder Case : मुलीला बहिणीकडे सोडायला आला अन् समोरचे दृश्य पाहून हादरला….

Posted by - August 16, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर जिल्हयामधील दुहेरी हत्याकांडाने (Double Murder Case) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये (Double Murder Case) कौटुंबिक वादातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *