crime

धक्कादायक ! लिफ्टमध्ये मान अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

604 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये लिफ्टचा दरवाजा अचानक बंद होऊन झालेल्या दुर्घटनेत 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू ( Dead) झाला आहे. साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी (Saqib Siddiqui Irfan Siddiqui) असे या मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत साकीबचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे त्याला आजी आजोबांकडे ठेवण्यात आले होते. शहरातील कटकट गेट भागात असणाऱ्या हयात हॉस्पिटलजवळच्या इमारतीत मृत साकीबचे आजी आजोबा राहतात. घटनेच्या दिवशी साकीब तिसऱ्या मजल्यावर खेळत होता. त्यावेळी तो लिफ्टमध्ये गेला अन् त्याने लिफ्ट सुरू केली. तेव्हा दरवाजा बंद होत असताना बाहेर पाहताना त्याचा गळा लिफ्टच्या दरवाज्यात अडकला.

यानंतर मोठा आवाज झाला. लिफ्टच्या दरवाज्यात गळा कापल्याने रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. यानंतर इमारतीमधील नागरिकांनी लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी (Jinci Police Station Inspector Ashok Bhandari) हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी साकीबचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. इमारत जुनी असल्याने तिथे लिफ्टला सेन्सर नाही. मॅन्युअर दरवाजा असल्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. साकीबच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

NIA

गडकरी धमकी प्रकरणाचा तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपुरात दाखल

Posted by - May 25, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. या धमकी (Threat) प्रकरणी तपास…
sharad pawar

शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला; शरद पवार अध्यक्षपदी कायम

Posted by - May 5, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी…
Justice Fathima Beevi

Justice Fathima Beevi : सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचं निधन

Posted by - November 23, 2023 0
केरळ : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती आणि तामिळनाडूच्या माजी राज्यपाल फातिमा बीवी (Justice Fathima Beevi) यांचे वयाच्या 96 व्या…
Nanded Accident

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Posted by - May 24, 2024 0
नांदेड : नांदेडमधून एक भीषण अपघाताची (Nanded Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *