Lady Teacher Died

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

631 0

बरेली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना (Lady Teacher Died) समोर आली आहे. यामध्ये खासगी शाळेतील शिक्षकेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रिया गंगवार असे या शिक्षिकेचे नाव असून ती 28 वर्षांची होती. प्रिया ही बरेलीच्या खासगी शाळेत ही शिक्षिका म्हणून कार्यरत होती. हुंडा न दिल्याने सासरच्यांनी प्रियाची हत्या केल्याचा आरोप प्रियाच्या माहेरच्यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या प्रिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रिया गंगवार आणि शिवांशु रस्तोगी यांनी एक वर्षाआधी प्रेम विवाह केला होता. या लग्नाला दोन्हीकडच्या परिवाराने परवानगी दिली होती. प्रिया लग्नानंतर सासरी राहायला लागली होती. तसेच ती राधा माधव शाळेत शिकवायला होती. तिच्या सासरची मंडळी टेलरिंगचा व्यवसाय करतात. प्रियाच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. प्रियाची वागणूक थोडी बदलली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी आपण तिला घेऊन तिच्या माहेरी गेलो होतो, संध्याकाळी आम्ही घरी परतलो, असे सासू अंजली रस्तोगीने सांगितले. पण अचानक प्रियाने हे पाऊल का ऊचलले? याबद्दल काहीच माहिती नसल्याचे प्रियाच्या सासूकडून सांगण्यात आले आहे.

प्रियाने आत्महत्या केली की तिची हत्या करुन मृतदेह लटकवण्यात आला? प्रियावर सासरच्यांकडून, कामावर किंवा इतर ठिकाणावरुन दबाव होता का? प्रिया आपल्या संसारात आनंदी होती का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा चारही बाजुंनी तपास करत आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याची गय केली जाणार नाही असेल आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Nanded Crime News

Nanded Crime News : नांदेड हादरलं ! एका मोबाईलवरून मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

Posted by - June 27, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded Crime News) भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मोबाईलच्या देवाण घेवाणीवरुन दोन भावांमध्ये मोठा…
Accident News

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Posted by - April 27, 2024 0
पुणे : पुणे एक्स्प्रेस वे वर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये टायर…

आतापर्यंत हजारो पुणेकर अडकले ‘जॉबट्रॅप’ मध्ये ; सायबर चोरट्यांचा धुमाकूळ (व्हिडीओ)

Posted by - February 18, 2022 0
पुणे- महिन्याकाठी तब्बल ८५ पुणेकर सायबर चोरट्यांच्या जॉब फ्रॉड ट्रॅपमध्ये अडकल्याचे वास्तव आहे.नामांकित कंपनीत प्लेसमेंट करून देतो, परदेशात अधिक पगाराची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *