Hardeepsingh Nijjar

Hardeep Singh Nijjar : कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या

728 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडा (Canada) मधील सरे येथे गुरु नानक सिंग गुरुद्वारामध्ये दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या केली.

Missing Children : खेळता खेळता कार लॉक झाल्याने तीन चिमुकल्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू

कॅनडातील शीख फॉर जस्टिसचे (SFJ) हरदीपसिंग निज्जर प्रमुख होता. तसेच तो खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता. कॅनडात बसून हरदीपसिंग निज्जर भारताविरुद्ध देशविरोधी कारवाया करत होता. प्राप्त झालेल्या माहितीनुसार,निज्जर ज्या गुरुद्वाऱ्यात त्यांची हत्या झाली त्या गुरुद्वाराचे प्रमुखही होते. शीख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याच्याही हरदीपसिंग निज्जर जवळचा होता.

हरदीपसिंग निज्जरवर 10 लाखांचे बक्षीस जाहीर होते
हरदीपसिंग निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्स या संघटनेचा प्रमुख होता. कॅनडामध्ये बसून तो खलिस्तानी कारवाई करत होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने सप्टेंबर 2020 मध्ये हरदीपसिंग निज्जरला दहशतवादी घोषित केले होते यानंतर हरदीपसिंग निज्जरच्या जालंधरच्या भरसिंग पुरा गावामधील मालमत्ताही जप्त करण्यात आली होती. हरदीपसिंग निज्जरने याच गावामधील एका पुजाऱ्याची हत्या केली होती. या हत्याद्वारे तो पंजाबमध्ये धार्मिक अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर एनआयएने हरदीपसिंग निज्जरवर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

हरदीपसिंग निज्जर 4 महिन्यांपूर्वीच दहशतवादी घोषित
केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतंच 4 महिन्यांपूर्वी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) केटीएफ संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले होते. “खलिस्तान टायगर फोर्स” ही कट्टरतावादी संघटना आहे. ज्यांचा मुख्य उद्देश हा पंजाबमध्ये दहशतवाद पसरवण्याचा आहे. पंजाबमधील टार्गेट किलिंग प्रकरणात या संघटनेचा मोठा हात आहे. ही संघटना भारताच्या एकता, राष्ट्रीय सुरक्षा, अखंडता,आणि सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.

Share This News

Related Post

राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी- चंद्रकांत पाटील

Posted by - April 21, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला…

“मै मानता ही नही हु कि मै राज्यपाल हु…!” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

Posted by - December 10, 2022 0
पुणे : सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचे…
Pimpri Chinchwad News

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Posted by - August 30, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील (Pimpri Chinchwad News) चिखली भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास…

पंढरपुरातील शासकीय महापूजेचा काय आहे इतिहास ?

Posted by - July 10, 2022 0
महाराष्ट्रात वारीची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी मैलोनमैल प्रवास करत वारीत सहभागी होतात आणि…
Balu-Dhanorkar

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक; समोर आली मोठी अपडेट

Posted by - May 29, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस (Congress) नेते बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांना आतड्यात इन्फेक्शन झाल्याने नागपूरातील रुग्णालयात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *