Keral Suicide

Keral Suicide : ‘ती’ मागणी पूर्ण करता न आल्याने डॉक्टर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

553 0

केरळच्या (Keral Suicide) तिरुवनंतपुरममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 26 वर्षांच्या डॉक्टर तरुणीने लग्नातली हुंड्याची मागणी पूर्ण न करता आल्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. डॉ. शहाना असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी तिरुवनंतपुरमच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून सर्जरी या विषयाच पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती.

डॉ. शहाना यांच्या कुटुंबाने आरोप केले आहेत की तिचा प्रियकर डॉ. रुवैस याच्या कुटुंबाने हुंड्यात 150 ग्रॅम सोनं, 15 एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कार मागितली होती. आम्ही ती मागणी पूर्ण करु शकत नाही हे आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर डॉ. रुवैसने आणि त्याच्या कुटुंबाने लग्न मोडलं. ज्यानंतर डॉ. शहानाने टोकाचं पाऊल उचललं. डॉ. शहानाजवळ एक सुसाईड नोटदेखील आढळली आहे. यामध्ये तिने सगळ्यांना फक्त पैसा प्रिय असतो असा उल्लेख केला आहे.

या प्रकरणानंतर केरळच्या आरोग्य मंत्री वीणा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी अहवाल सादर करण्यासही सांगितलं आहे. तसेच या प्रकरणाची राज्य अल्पसंख्याक आयोगानेही दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पी. सतीदेवी यांनी डॉ. शहाना यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vasai Crime News : खळबळजनक ! ‘त्या’ एका शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून 8 वर्षीय चिमुकलीची हत्या

Rupali Chakankar : राष्ट्रवादी कुणाची; रूपाली चाकणकरांनी दिलं ‘हे’ उत्तर

TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

Share This News

Related Post

#BULDHANA : पतीच्या विरुद्ध असलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा म्हणून पत्नीचे शोले स्टाईल आंदोलन, बुलढाण्यात चर्चेचा विषय

Posted by - March 10, 2023 0
BULDHANA : पतीवर दाखल झालेला खोटा गुन्हा पोलिसांनी मागे घ्या आणि पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी करत महिला थेट…

महत्वाची बातमी ! सिद्धू मुसावाला यांची हत्या करणाऱ्या ८ पैकी दोघे शुटर पुण्यातील

Posted by - June 6, 2022 0
  पुणे- पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसावाला याच्या हत्येबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता याबाबत नवीन धक्कादायक माहिती समोर…
Amravati News

Amravati News : अमरावतीमधील ‘त्या’ कमानीचा वाद चिघळला; जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

Posted by - March 11, 2024 0
अमरावती : अमरावतीमधून (Amravati News) एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या खानापूर पांढरी मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा…

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Posted by - May 21, 2024 0
छत्रपती संभाजीनगर: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन तरुणाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी…

पुण्यात १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, शाळेच्या बाथरूममध्ये केले घृणास्पद कृत्य

Posted by - March 24, 2022 0
पुणे- पुण्यात एका १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *