जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाचा दणका ! अटक होण्याची शक्यता

374 0

सातारा- मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयानं दणका दिला असून आज झालेल्या सुनावणीमध्ये जयकुमार गोरे यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.

तसेच याचिकाकर्त्याला संबंधित कागदपत्र सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी १७ मेपर्यंत तहकूब केली आहे.

त्यामुळे आता आमदार गोरे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे उच्च न्यायालयात राज्य सरकारने आमदार गोरे यांच्या जामीनाला जोरदार विरोध केला. यापूर्वी आमदार गोरे यांचा वडुज सत्र न्यायालयानेही अटकपूर्व जामिनासाठी फेटाळला आहे. त्यामुळे आता गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

काय आहे प्रकरण ?

महादेव पिराजी भिसे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक शेतकरी, जो मयत आहे, त्याला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज केला गेला. त्यातून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केली गेली, असा आरोप जयकुमार गोरेंवर आहे.

Share This News

Related Post

पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून आढळली तब्बल चार कोटी रुपयांची रोकड (व्हिडिओ)

Posted by - March 30, 2022 0
लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून तब्बल चार कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली. याप्रकरणी सांगलीच्या दोघांना ताब्यात घेतले…
Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Expressway : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी 2 तासांचा ब्लॉक

Posted by - October 9, 2023 0
मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai – Pune Expressway) पुणे वाहिनीवर कि.मी. 45/000 अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी…

PUNE CRIME : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम ; झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने खुनी हल्ला

Posted by - January 17, 2023 0
पुणे : कोयता गॅंगने पुन्हा एकदा पुण्यामध्ये धुडगूस घातला आहे. शिवाजीनगर जवळील एका मैदानावर झोपलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर तरुणांनी कोयत्याने…
Neelam Gorhe

दीपावलीच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी महिला, उद्योजक यांच्या शेतमालाला भाव आणि असंघटित कामगारांसाठी सरकारने धोरण आखावे

Posted by - October 23, 2022 0
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार सुमारे ८० टक्के महिला आर्थिक क्षेत्रात सक्रिय आहेत. यात कृषी क्षेत्रात ३३…

लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्र भाजपात फेरबदल होणार? आशिष शेलार चंद्रशेखर बावनकुळे तातडीनं दिल्लीला रवाना

Posted by - June 7, 2024 0
नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळवता आलं असून आता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *