Jalna Murder

Jalna Murder : धक्कादायक! चर्चेला बोलावलं अन् घात केला; जालन्यात वंचितच्या जिल्हा महासचिवांची हत्या

570 0

जालना : जालना (Jalna Murder) जिह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव यांची निर्घृणपणे हत्या (Jalna Murder) करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष आढाव असे वंचितच्या जिल्हा महासचिवांचे नाव आहे. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष आढाव यांची हत्या त्यांच्या चुलत्यानेच केली असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. जालना पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Ravindra Mahajani : हवापालटास आले अन् प्राण गमावले; रवींद्र महाजनींसोबत नेमकं काय घडलं?

जमिनीच्या वादातून हत्या?
जालन्यात (Jalna Murder) वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष आढाव यांची हत्या झाली आहे. शेतीच्या वादातून चुलत्यानेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. आढाव कुटुंबीयांना शासनाकडून रामनगर साखर कारखाना याठिकाणी गायरान जमीन मिळाली होती. मात्र याच जमिनीवरून संतोष आढाव आणि त्यांच्या चुलत्यांमध्ये वाद होता. काल रात्री चुलत्याने त्यांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी चर्चेदरम्यान मोठा वाद झाला आणि याच वादातून संतोष आढाव यांची हत्या करण्यात आली.

Solapur News : सोलापूर हादरलं ! बायकोला विहिरीत ढकलून स्वतःदेखील केली आत्महत्या

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष आढाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Related Post

Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe : आळंदीचा विकास आराखडा तयार करताना भाविकांना केंद्रस्थानी ठेवावे : डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - July 31, 2023 0
आळंदी : भाविकांना केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध विकास आराखडा बनवावा तसेच देवस्थानच्या विकासाकरिता लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम…

नगरसेवक ते राज्यसभा खासदार; कसा आहे वंदना चव्हाण यांचा जीवनप्रवास

Posted by - July 6, 2022 0
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शांत, संयमी,अभ्यासू चेहरा अशी ओळख असलेल्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा आज वाढदिवस. आता पर्यंत वंदना…

कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ परिसरात भरारी पथकाकडून आत्तापर्यंत 10 हजार वाहनांची तपासणी; 10 लाखाची रोकड तर 12 हजाराची दारू जप्त

Posted by - February 23, 2023 0
पुणे : सध्या पुणे शहरामध्ये पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कसबा पेठ इथून एक मोठी बातमी समोर येते आहे. कसबा पेठ…

24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी कधी पाहिली आहे का ? किंमत वाचून तुम्हीही व्हाल चकित

Posted by - May 2, 2023 0
आतपर्यंत मँगो, पिस्ता, चॉकलेट फ्लेवरच्या कुल्फी आपण ऐकल्या असतील पण सोन्याची कुल्फी आणि त्यातही 24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी असं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *