drowning hands

पोटच्या मुलाला वाचवण्याच्या नादात पाण्यात बुडून मायालेकरांचा दुर्दैवी मृत्यू

1178 0

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पाण्यात बुडून मायालेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. मुलाचा मृतदेह सराटी शिवारात डाव्या कालव्यात आढळला. तर आईचा मृतदेह अद्याप आढळला नसून त्याचा शोध घेतला जात आहे.

काय घडले नेमके?
सार्थक रवींद्र गारुळे असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर वंदना गारुळे असे मृत पावलेल्या आईचे नाव आहे. घटनेच्या वेळी सार्थक आपल्या आईसोबत डाव्या कालव्यात धुणे धुण्यासाठी गेला होता. यादरम्यान सार्थकचा अचानक पाय घसरला आणि तो कालव्यात पडला. यानंतर आपला पोटचा मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून आई वंदना यांनी मुलाला वाचवण्यासाठी तातडीने पाण्यात उडी घेतली. मात्र पाणी अधिक खोल असल्यामुळे या मायालेकरांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत सार्थकचा मृतदेह गुरुवारी सकाळी सात वाजता सराटी शिवारातील पुलाजवळ आढळून आला तर आई वंदना यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. वंदना यांचे नातेवाईक आणि गावकरी त्यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. सार्थकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक ! मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र, तिघांविरोधात गुन्हा

Posted by - May 14, 2022 0
पुणे- मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर पोलीस आणि वैद्यकीय विभागाने या मोटारीचा पाठलाग…
T

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीचा मृत्यू

Posted by - February 28, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी 7 आरोपींची सुटका करण्यात आली होती, त्यापैकी…

बाबा कल्याणी हे औद्योगिक राष्ट्रवादाचे प्रतीक- नितीन गडकरी

Posted by - June 4, 2022 0
पुणे – आत्मनिर्भर भारत ज्यांच्या नेतृत्वाखाली घडवायचे आहे, त्या नेतृत्वाचा हा सत्कार आहे. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधानांचे लक्ष्य आहे.…
Aurangabad News

Aurangabad News : धक्कादायक ! ‘ताई, मला माफ कर’ रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने बहिणीच्याच घरात घेतला गळफास

Posted by - August 31, 2023 0
औरंगाबाद : देशभरात बुधवारी (30 ऑगस्ट) बहीण-भावाचा सण म्हणजेच रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे केले जात असताना औरंगाबादमध्ये (Aurangabad News)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *