Jalgaon News

Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या

444 0

जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये जामनेर तालुक्यात देऊळगाव गुजरी इथं पत्नीसह 9 महिन्यांच्या मुलीची पतीने हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एवढेच नाहीतर पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर पतीनेसुद्धा गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीची तिच्या माहेरी हत्या केल्यानंतर बुलढाण्यात दुधलगाव इथं जाऊन पतीने स्वत:ला संपवलं. ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
विशाल झनके व प्रतिभा झनके असे मृत पती – पत्नीचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या देऊळगाव गुजरी येथे माहेरी आलेल्या पत्नी व नऊ महिन्याच्या मुलीची पतीने हत्या केली. पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर पतीनेही बुलढाणा जिल्ह्यातील दुधगाव येथे आपल्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांमध्ये कौटुंबिक वाद होते.

यामुळे प्रतिभा झनके आपल्या 9 महिन्याच्या मुलीसह तीन महिन्यापासून देऊळगाव गुजरी येथे माहेरी राहत होत्या.विशाल झनके याने देऊळगाव गुजरी येथे येऊन पत्नी व मुलीची हत्या केली. पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर विशाल बुलढाणा जिल्ह्यातील दुधलगाव येथे आपल्या घरी आला. तिथे त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Sanjay Raut

Radhakrishna Vikhe Patil : ‘संजय राऊत सर्वात मोठा दलाल’ राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका

Posted by - September 21, 2023 0
अहमदननगर : राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदननगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संस्थेत झाकीर…
Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

Posted by - February 9, 2024 0
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची (Abhishek Ghosalkar Firing) काल रात्री दहीसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात…
Gunaratna Sadavarte

Gunaratna Sadavarte : सदावर्तेंच्या पॅनेलने पवारांच्या पॅनलचा केला पराभव; एकहाती जिंकली निवडणूक

Posted by - June 26, 2023 0
मुंबई : एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेची 23 जून रोजी निवडणूक झाली होती. राज्यातील एकूण 281 मतदान केंद्रावर…

‘निवडणुकीसाठी बायको पाहिजे’ अशी बॅनरबाजी करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा

Posted by - January 31, 2022 0
औरंगाबाद- निवडणुकीसाठी बायको पाहिजे, अशी बॅनरबाजी करून औरंगाबाद शहरात खळबळ उडवणाऱ्या एका राजकीय कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *