Jalgaon News

Jalgaon News : वडिलांसोबत शाळेत जाताना चिमुकलीचा नियतीने केला घात; कुटुंबाकडून मन हेलावून टाकणारा आक्रोश

663 0

जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथे शाळेत जात असलेल्या पितापुत्री यांच्या सायकलला भरधाव आयशर वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने बाप-लेक गंभीर जखमी झाले. या अपघातात मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.ही अपघाताची घटना शुक्रवारी सकाळी पहूर बसस्थानकाजवळ घडली. यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संपूर्ण महामार्ग रोखून धरला होता. ज्ञानेश्वरी शंकर भामरे (11) असे या अपघातात मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
शंकर भामेरे पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आहेत. ज्ञानेश्वरी डॉ. हेडगेवार विद्यालयात इयत्ता 5 वीमध्ये शिकत होती. जळगावात होणाऱ्या कुमार साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी आज जळगावात निवड फेरी होती. त्यासाठी ज्ञानेश्वरीला स्वत: लिहलेल्या कविता सादर करण्यासाठी जळगावात यायचे होते. तिला वडील शंकर भामरे सायकलने पहूर बसस्थानकावर घेऊन येत होते. स्थानकाजवळ असणाऱ्या नाल्याजवळ बांधकाम सुरु आहे. तेथे कच्च्या रस्त्यावर जात असताना मागून येणाऱ्या भरधाव आयशरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात शंकर भामरे आणि त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी गंभीर जखमी झाले.

यानंतर ग्रामस्थांनी तातडीने जखमी ज्ञानेश्वरी आणि शंकर भामरे यांना उपचारासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी ज्ञानेश्वरीला तपासून मृत घोषित केले.तर जखमी वडील शंकर भामरे यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी आयशर चालक सुनिल ज्ञानदेव सोनवणे (रा. अंजनवटी ता. जिल्हा बीड) याला अटक केली आहे. या अपघातामुळे पहूर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पहूर बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

Share This News

Related Post

द्राक्ष व्यापाऱ्याकडील १ कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीला फिल्मी स्टाइलने ८ तासात पोलिसांनी केले गजाआड

Posted by - March 30, 2023 0
सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटल्याचा प्रकार मंगळवारी घडला होता. सांगली पोलिसांनी तपासाची चक्रे…
Maharashtra Rain

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी

Posted by - April 12, 2024 0
मुंबई : राज्यातील कोकण, मुंबई आणि पालघर भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसाळी वातावरण (Weather Update) होत आहे. सध्या गुजरातपासून कोकणासह…
Deepak Mankar

Deepak Mankar : अजित पवारांच्या गटाकडून माजी उपमहापौर दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड

Posted by - July 6, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाकडून माजी उपमहापौर दीपक मानकर (Deepak Mankar) यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली…
Jalna Bribe News

Jalna Bribe News : तक्रारदाराने लढवली शक्कल ! लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला आणलं गोत्यात

Posted by - August 24, 2023 0
जालना : हल्ली छोट्या मोठ्या कामासाठी लोकांकडून भरमसाठ लाच (Jalna Bribe News) घेतली जाते. मग ते सरकारी ऑफिस असो वा…
Merath

हिंदू मुलाशी मैत्री केली म्हणून भर बाजारात जमावाचे मुस्लीम मुलींशी गैरवर्तन (Video)

Posted by - May 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) मेरठमधून (Meerut) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्या ठिकाणचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *