Jalgaon Crime News

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

363 0

जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्र गोळीबाराच्या घटनांमध्ये (Jalgaon Crime News) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्र्रात खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या गोळीबारात जबर जखमी झालेल्या महेंद्र मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महेंद्र मोरे यांच्यावर सुरुवातीला चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचराचांना साथ देत नसल्याने त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असताना महेंद्र मोरे यांची प्राणज्योत मालवली.

कसा झाला हल्ला?
बुधवारी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्याचवेळी पाच अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून हातात पिस्तूल घेऊन आले होते. कारमधून उतरताच ते महेंद्र मोरे यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. ही घटना पूर्णपणे कॅमेऱ्यात कैद झाली नसली तरी आरोपी एका कारमधून कसे उतरतात, हातात बंदुका घेऊन कशा प्रकारे माजी नगरसेवकाच्या कार्यालयात शिरतात हे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाने यासाठी तीन विशेष पथके तैनात केली आहेत त्यांच्याकडून आरोपींचा शोध सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Abhishek Ghosalkar : मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी ‘या’ व्यक्तीला करण्यात आली अटक

Viral Video : चालत्या बसमध्ये दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींना चपलेने धुतले

Ketaki Chitale : लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेने लगावला ‘हा’ टोला

Mohammed Shami : ‘माझ्या लेकीला भेटू देत नाही…’, मोहम्मद शमीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या हत्येचा कट रचला; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा गंभीर आरोप

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

Abhishek Ghosalkar Muder : कोरोना योद्धा पुरस्कार विजेता मॉरिस कसा बनला मारेकरी

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल

Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या

Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

Nanded Accident : वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share This News

Related Post

Thane Crime News

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - December 10, 2023 0
ठाणे : ठाणे (Thane Crime News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात…

हवेलीत छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Posted by - March 11, 2022 0
राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत असून उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे पुण्यातील हवेली या ठिकाणी…

फार्म हाऊसमध्ये CASINO …! दारूच्या बाटल्यांचा खच…! पोलीस इन्स्पेक्टर , तहसीलदार यांच्यासह 70 जण ताब्यात

Posted by - August 22, 2022 0
राजस्थान : राजस्थानच्या जयपुर जिल्ह्यातील जयसिंहपुरा मधून एक खळबळजनक माहिती समोर येते आहे . जयपूर जिल्ह्यातील जयसिंहपुरा येथील खोर पोलीस…
Ramdas kadam and Bhaskar Jadhav

Ramdas Kadam : भास्कर जाधवांना शिंदे गटात का घेतलं नाही? रामदास कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Posted by - March 10, 2024 0
मुंबई : दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव केला होता तेव्हा भास्कर जाधव हे शिंदे गटात येणार…
Sanjay Raut

Sanjay Raut : लोकसभेत मविआ 48 पैकी ‘एवढ्या’ जागा जिंकेल; संजय राऊतांनी वर्तवले भाकीत

Posted by - April 5, 2024 0
मुंबई : 2024 या लोकसभा निवडणुकीला (Loksabha) सुरुवात झाली असून देशात या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या,जाणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *