Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

363 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये पोलीस आणि नागरिकांदरम्यान मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. अतिक्रमण तोडण्यासाठी पोलिसांसह महापालिकेचं पथक या ठिकाणी गेले असता नागरिकांनी पथकावर दगडफेक केली. नागरिक आक्रमक झाल्याचे पाहताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जनतेला पिटाळून लावत परिस्थिती नियंत्रणात आणली.

काय घडले नेमके?
पोलिसांचे पथक व महापालिकेचे कर्मचारी सकाळीच अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले होते. स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महिला मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होतं. तसंच, अवैध धंदे चालत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी टपरी चालकांना आणि त्या ठिकाणी घरे आहेत त्यांना नोटिसी देण्यात आल्या. मात्र नोटिस देऊनही घरे खाली करण्यात आली नव्हती. त्यामुळं अखेर पोलिस मोठा फौजफाटा घेऊन परिसरात दाखल झाले. व परिसरातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी व महापालिकेच्या पथकाने बांधकाम तोडण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनीही बळाचा वापर करत लाठीचार्ज केला व अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. जे लोक दगडफेक करत होते त्यांना हिसकावून लावले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी परिसरात तणाव असल्याचे समोर आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Related Post

Rohit Pawar

Rohit Pawar : शिंदे सरकारने कोट्यवाधींचा घोटाळा केल्याचा रोहित पवारांचा आरोप

Posted by - March 22, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील…

MAHARASHTRA POLITICS : “राज्यपालांना शरम वाटली पाहिजे, राज्यपालांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल !” शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा

Posted by - December 17, 2022 0
मुंबई : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल राज्यपाल टिंगल टवाळी करत आहेत. ही टिंगलटवाळी करताना राज्यपालांना शरम वाटली…

पोलीस खात्यात सामील व्हायचंय ? पोलीस भरती सुरु होणार ! तयारीला लागा

Posted by - May 19, 2022 0
मुंबई- पोलीस भरतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती होणार आहे. त्यामुळे पोलीस दलामध्ये सामील होण्याची…

भयानक : गर्भवती पत्नीपासून कोणत्याही परिस्थितीत व्हायचे होते विभक्त; पत्नीला दिले HIV बाधित रक्ताचे इंजेक्शन; आणि मग…

Posted by - December 19, 2022 0
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील या भयावह घटनेने देश हादरला आहे. पत्नीपासून कोणत्याही परिस्थितीत विभक्त होण्याच्या उद्देशाने पतीने क्रूरतेचा कळस…

नेमका कसा झाला विनायक मेटेंचा अपघात; पोलीस अहवाल TOP NEWS मराठीच्या हाती

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *