Akola News

Akola News : रागावून माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्यामुळे पतीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

17736 0

अकोला : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली आहे. मूर्तिजापुरच्या उमरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी घरी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून पत्नी आणि पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले.यानंतर आरोपीने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार करून गंभीर जखमी केले. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पुनम समाधान राऊत (वय 23) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. तर समाधान गौतम राऊत असे आरोपी पतीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आरोपी पतीविरोधात मूर्तिजापुर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
उमरी गावातील प्रकाश खंडारे यांची मुलगी पुनम हिचा विवाह काही वर्षांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मोरड गावातील रहिवासी समाधान गौतम राऊत याच्यासोबत झाला होता. लग्नाच्या सुरुवातीला काही दिवस चांगले गेले नंतर दोघांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. हा वाद असह्य झाल्याने पुनम मागच्या काही महिन्यांपासून तिच्या माहेरी वडिलांकडे राहायला आली. दरम्यान, 13 ऑगस्टला पुनम घरी एकटी होती. वडील शेतात कामाला गेलेले होते, तिचा पती समाधान हा घरी आला अन् त्याने पत्नीला सोबत चल म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुनमने पुन्हा संसार थाटण्यास नकार दिला. यानंतर त्यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद झाला.

हा वाद एवढा वाढला कि संतापाच्या भरात त्याने थेट रागाच्या भरात पत्नी पुनमच्या डोक्यात हातोड्याने वार केले. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. त्यानंतर समाधान घटनास्थळावरून फरार झाला. पुनमच्या डोक्याला मार लागल्याने कुटुंबीयांनी तिला मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मूर्तिजापूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी आरोपी समाधान राऊतला अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेंद्र राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

सोलापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : जनता थेट करणार गावच्या सरपंचाची निवड; सरपंचपदासाठी 1068 अर्ज दाखल, वाचा सविस्तर

Posted by - December 3, 2022 0
सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी सरपंचाची निवड थेट जनता करणार असल्यामुळे…

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन निवडणुकीत सहकार भारतीचा दणदणीत विजय सहकार भारतीचे 15 उमेदवार विजयी

Posted by - November 16, 2022 0
मुंबई : दि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १५ जागांवर विजय मिळवत सहकार भारती पुरस्कृत…
Santosh Bangar

Hingoli : आमदार बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ‘ती’ कृती पडली महागात

Posted by - August 29, 2023 0
हिंगोली : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि प्रकरणामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या अडचणीमध्ये आता…

HEAVY RAIN : पुन्हा जोरदार पाऊस, पुन्हा रस्त्यांचे झाले ओढे, पुणे तिथे काय उणे… PHOTO

Posted by - October 14, 2022 0
पुणे : पुण्याला आज दुपारी पावसाने पुन्हा एकदा जोरदार झोडपून काढले आहे. कुलाबा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १८ ऑक्टोबर पर्यंत…

#TIKTOK : रिल्स बनवण्याच्या नादात पुण्यातील दोघा प्रसिद्ध TIKTOK स्टारने उडवले महिलेला; महिलेचा जागीच मृत्यू

Posted by - March 8, 2023 0
पुणे : आज-काल रील्स बनवून त्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी चांगला पैसा कमवत आहे. अनेक जण अगदी टिक टोक स्टार्स होऊन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *