Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नीची हत्या करून पतीचीदेखील आत्महत्या

505 0

सोलापूर : सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातील माढा तालुक्यातील व्होळे खुर्द या ठिकाणी एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत महादेव ओहोळ (वय 34, मूळ रा. मोडनिंब, सध्या रा. व्होळे खुर्द) असे पतीचे तर सोनाली ओहोळ (वय 26) पत्नीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
प्रशांत हा त्याच्या आई-वडिलांसोबत भांडण करुन आपल्या सासरी आला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून तो सासू सासऱ्यांच्या गावीच राहत होता. जावई आणि मुलगी डोळ्यासमोर राहत असल्याने सासरचे लोक देखील आनंदात होते. पण, प्रशांतने अचानक हे धक्कादायक पाऊल उचलल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे. प्रशांत ओहोळ याने पत्नी सोनालीचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माढा तालुक्यातील व्होळे (खुर्द) येथे शनिवारी सकाळी घडली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. टेंभुर्णी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जावयाने मुलीला ठार करून स्वतःही आत्महत्या केल्याने सासू-सासऱ्याला आणि सासरकडील लोकांना जबर धक्का बसला आहे. जावयाने अचानक हे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News

Related Post

सीसीटीव्हीमधून सासऱ्याची विधवा सुनेवर नजर, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा

Posted by - January 24, 2022 0
विधवा सुनेवर नजर ठेवण्यासाठी सासऱ्याने हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडलाय. सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास नकार दिल्यामुळे पीडित महिलेने…

मोठी कारवाई : पुणेकर खात होते भेसळयुक्त तूप ? अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने भेसळयुक्त तुप बनविणाऱ्या विरुद्ध कारवाई

Posted by - August 11, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींग मधील गोदाम जवळील पेढीवर…
Sindhudurga News

Sindhudurg News : कुटुंबावर दु:खाचा डोंगर ! सकाळी पाणी सोडायला गेला; अन्..

Posted by - September 19, 2023 0
सिंधुदुर्ग : आज महाराष्ट्रात सगळीकडे गणपतीचा सण साजरा केला जात आहे. यादरम्यान सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg News) एक धक्कादायक घटना घडली आहे.…

माळीणची पुनरावृत्ती; रायगड जिल्ह्यातील इरशाळ गाव ढिगाऱ्याखाली; मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

Posted by - July 20, 2023 0
रायगड : जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका वसाहतीवर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये 120 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेअसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेहबाहेर काढण्यात आले आहेत. तसंच एकूण 27 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. यामध्ये सुमारे 90 घरे ढिगाऱ्याखाली गेली असून अधिक जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *