Death of Trekker

Death of Trekker : हरिशचंद्र गडावर गेलेल्या त्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? 2 दिवसांनी समोर आलं धक्कादायक कारण

677 0

नाशिक : सध्या पावसाळा सुरु असल्याने अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठ्या (Death of Trekker) प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. पावसाळी पर्यटनात अनेक पर्यटक ट्रेकिंग (Death of Trekker) करण्यासाठी घरा बाहेर पडत असतात. असाच पर्यटकांचा एक ग्रुप हरिशचंद्र गड येथे गेला होता. मात्र प्रचंड धुके, वारा, पाऊस असल्याने ते सगळेजण वाट चुकले आणि यादरम्यान एका पर्यटकाला थंडी वाजून आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर 2 दिवसांनी त्याचा मृत्यू कसा झाला हे समोर आले आहे.

पुण्यातील 6 जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी आला होता
पुणे येथील सहा जणांच्या एका ग्रुपने पावसाळी ट्रेकिंगला जाण्याचा निर्णय घेतला. जायचं कुठे हा प्रश्न होता. सर्वानुमते हरिशचंद्र गडावर जाण्याच ठरलं. एक ऑगस्टला अनिल उर्फ बाळू नाथराव गीते (वय 32),अनिल मोहन आंबेकर (वय 33), गोविंद दत्तात्रय आंबेकर (वय 35),तुकाराम आसाराम तिपाले (वय 40), हरिओम विठ्ठल बोरुडे (16) ,महादू जगन भुतेकर (वय 38) हे सर्व तरुण हरिशचंद्र गडावर ट्रेकिंगसाठी निघाले.

अचानक गडावर मोठ्या प्रमाणात धुक वाढलं
हे लोक खाजगी वाहनाने पाचनई गावात दुपारी तीन वाजता पोहचले. अंगावर पावसाचे तोडके कपडे घालून सहाही जण गडाच्या मध्यावर पोहचले. यावेळी आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढत हे तरुण पुढे निघाले. मात्र, अचानक गडावर मोठ्या प्रमाणात धुक वाढलं. त्यामुळे समोर असलेला व्यक्ती सुद्धा कोणाला दिसत नव्हता. यानंतर 6 तरुण जंगलात वाट मिळेल त्या दिशेने जाऊ लागले. धुक आणि रात्रीचा अंधार असल्याने संपूर्ण रात्र जंगलात गेली. सकाळी पाऊस सुरु झाला आणी काही प्रमाणात धुक कमी झाल. यानंतर मित्रांची शोधाशोध सुरु झाली. यादरम्यान थंडीत कुडकुडून अनिल गीते याचे शरीर कडक झाल्याचे दिसून आले.

मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क झाला नाही
मोबाईला रेंज नसल्यामुळे या लोकांना कोणालाही संपर्क करता आला नाही. यामुळे हे तरुण जंगलात आणखीनच भरकटत गेले. अखेर गाईडच्या मदतीने रात्रीच शोध घेत त्यांच्या पर्यंत पोहचले. यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने सहाही जणांना गडावरून (Death of Trekker) खाली आणण्यात आले. सर्व तरुणांना राजूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यावेळी अनिल उर्फ बाळू गीते यांचा मृत झाला असल्याचे डॉक्टरांनी यावेळी घोषित केले. यानंतर ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून बाळू गीते यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे गीते कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Related Post

इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेले; ‘असा’ घडला घटनाक्रम ?

Posted by - March 3, 2022 0
विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील…

Nashik News : नाशिकमध्ये आसाम रायफल्स माजी सैनिक संघ केंद्राचे 21 एप्रिलला उद्घाटन

Posted by - April 15, 2024 0
नाशिक : आसाम रायफल्स वेटरन्स दिन 23 मार्च 2024 रोजी साजरा (Nashik News) झाला. त्यानंतर आता आसाम रायफल्स महानिदेशालय,आसाम रायफल्स…

#CRIME NEWS : दारूच्या नशेत नातवाने 90 वर्षाच्या आजीला मारहाण करून संपवलं; वडिलांना उचलून जमिनीवर आपटलं, दारुणे कुटुंब उध्वस्त केलं !

Posted by - February 14, 2023 0
नवी दिल्ली : दारूच्या आहारी गेल्याने आजपर्यंत अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अजून एक उदाहरण त्यामध्ये आता मोजले जाणार आहे.…

कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीडिया बनतेय मूलभूत गरज – जवाहर सरकार यांचे प्रतिपादन; एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन

Posted by - November 10, 2022 0
पुणे : “अन्न, वस्त्र, निवारा आणि कनेक्टिव्हीटी या आजच्या काळातील मूलभूत गरजा आहेत. डिजिटल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला…

ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड

Posted by - May 31, 2022 0
राष्ट्रवादीच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *