Hardik Pandya

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

784 0

मुंबई : आयपीएलचे सामने सुरु असतानाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मोठा धक्का बसलेला आहे. मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभव पांड्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आल्यामुळे वैभवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वैभव पांड्याला बुधवारी हार्दिक आणि कृणाल पांड्याची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. वैभव पांड्या हा 37 वर्षांचा असून त्याने मुंबईतील पार्टनरशिप फर्ममधून सुमारे 4.3 कोटी रुपयांची हेराफेरी केल्यामुळे हार्दिक आणि त्याचा भाऊ क्रुणाल यांचे नुकसान झाले, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नेमके प्रकरण काय?
2021 मध्ये तिघा भावांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता. भागीदारीच्या अटी होत्या की हार्दिक आणि कृणाल प्रत्येकी 40% भांडवल घालतील तर सावत्र भाऊ वैभव 20 टक्के घेऊन दैनंदिन कामकाज सांभाळणार. नफा त्याच प्रमाणात वाटला जाणार होता मात्र भागीदारी कराराचे उल्लंघन करून हार्दिक आणि कृणालला न कळवता वैभवने त्याच व्यवसायात दुसरी फर्म सुरु केली. या सगळ्यामध्ये, मूळ भागीदारीचा नफा कमी झाल्यामुळे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वैभवने गुपचूपपणे त्याचा नफा 20 टक्क्यांवरून 33.3 टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे हार्दिक आणि त्याच्या भावाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वैभवने पार्टनरशिप फर्मच्या खात्यातून एक कोटी रुपये घेतले आणि लाखो रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

संतापजनक ! दोन अल्पवयीन मुलांचे चिमुकलीवर अत्याचार, औरंगाबादमधील घटना

Posted by - February 21, 2022 0
औरंगाबाद- खाऊ देण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलांनी एका दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. दोन अल्पवयीन…
Solapur Accident

Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

Posted by - June 19, 2023 0
सोलापूर : राज्यात अपघाताचे (Soalpur Accident) प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगोला तालुक्यातील आदमापूर येथील मंदिरातून बाळूमामांचे…
Rahul Narvekar

Email Hack : विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन ‘त्या’ आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

Posted by - March 5, 2024 0
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अधिकृत मेल हॅक (Email Hack) करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ…
Jalgaon News

Jalgaon News : जळगावमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Posted by - June 30, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon News)रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीने…
Jalna Crime

पित्याने विष पाजलेल्या ‘त्या’ चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Posted by - May 17, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. यामध्ये चारित्र्यावर संशय घेल्यामुळे पती- पत्नींमध्ये वाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *