Solapur Crime

Solapur Crime : शेतात काम केल्याचे पैसे न दिल्याने संतापलेल्या नातवाने आजीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

12375 0

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime) आजी आणि नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये शेतातील काम करुन घेत कामाचे पैसे न दिल्याच्या रागातून नातवाने आजीची हत्या (Solapur Crime) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माढा तालुक्यातील लऊळ गावामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हर्षद शिंदे असे आरोपी नातवाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
हर्षद शिंदे हा पुण्यात आई-वडिलांसोबत पुण्यात राजगुरुनगर येथे राहत होता. हर्षद माढा तालुक्यातील लऊळ गावी आपल्या आजी-आजोंबाकडे नेहमीप्रमाणे रहायला आला होता. आजी त्याच्याकडून शेतात काम करुन घ्यायची. यादरम्यान उसाचे पैसे आजोबांच्या खात्यात आले होते. ते पैसे काढून मला द्या असे आरोपीने आजोबांना सांगितले. यावरुन नातू आणि आजोबांमध्ये भांडण होत होते. यानंतर आजीने दोघांचे भांडण सोडवण्यसाठी मध्यस्थी केली. याचा राग आरोपीच्या मनात होता.

आजोबा घरी आल्यानंतर घटना उघड
यानंतर (Solapur Crime) आरोपीने रागाच्या भरात चुलीजवळ जेवण करत असलेल्या आजीला बाहेर ओढत नेले. मग तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. दुसऱ्या गावात शेतात मजुरीला गेलेले आजोबा घरी आले तर पत्नी मृतावस्थेत आढळली. यानंतर कुर्डूवाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु करत चौकशी केली असता नातवाने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर आरोपी नातू पळून जायच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

Share This News

Related Post

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक, पण या निर्णयाचा आदर राखला जाईल का ? – ऍड प्रकाश आंबेडकर

Posted by - September 28, 2022 0
पुणे – शिवसेनेच्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला…
Rikshaw

सहकार नगरमधील मुक्तांगण शाळेशेजारी रिक्षावर झाड कोसळले; महिलेचा मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
पुणे : पुण्यातील सहकार नगर, मुक्तांगण शाळेशेजारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका रिक्षावर मोठे झाड कोसळल्यामुळे एका महिलेला…
Gold Scheme

Sovereign Gold Bond Scheme: 11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करता येणार; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् बरंच काही

Posted by - September 9, 2023 0
आरबीआय लोकांना स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. हे सोनं तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतींत खरेदी करू शकता. ग्राहकांना सॉव्हरिन…
Lady Teacher Died

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Posted by - March 3, 2024 0
बरेली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना (Lady Teacher Died) समोर आली आहे. यामध्ये खासगी शाळेतील शिक्षकेचा मृतदेह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *