Crime News

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

437 0

पाटणा : बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजप आमदाराच्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या (Crime News) करण्यात आली. बुधवारी सकाळी हल्लेखोरांनी बिहारमध्ये कटिहार जिल्ह्यात भाजप आमदार कविता पासवान यांच्या पुतण्यावर गोळीबार केला. यामध्ये कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवान याचा जागीच मृत्यू झाला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बिहारच्या कोढा विधानसभा मतदारसंघाच्या महिला आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवानवर गोळीबार झाला. कटिहार शहरातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. नीरज पासवान यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. नीरज पासवानची त्याच्या घराजवळच हत्या करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

कोण होता नीरज पासवान ?
नीरज पासवान हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. माजी महापौर शिवराज पासवान हत्याकांड प्रकरणी तो आरोपी होता आणि नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. दरम्यान, भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Related Post

Solapur Crime

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Posted by - January 30, 2024 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime) वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाने आपल्या वडिलांकडे मोबाईल…
Beed Warkari

वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात ! दिंडीत रिक्षा घुसल्याने अनेक वारकरी जखमी

Posted by - June 13, 2023 0
बीड : जळगाव जिल्ह्यातील रावेरहून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीचा बीडमध्ये अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन वारकरी गंभीररित्या जखमी…

नवाब मलिक आणखी दोन आठवडे तुरुंगातच!

Posted by - April 4, 2022 0
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मलिक यांचा तुरुंगातील…
Satara News

Satara News : पुणे बंगळुरु महामार्गावर 4 गाड्यांचा विचित्र अपघात

Posted by - September 8, 2023 0
सातारा : राज्यात सध्या अपघाताचे (Satara News) प्रमाण वाढतच चालले आहे. धक्कादायक, भयानक अपघाताचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत…
Accident News

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 24, 2023 0
सोलापूर : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतानाच दिसत आहे. सोलापूरमधून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *