Gondia Crime

Gondia Crime : अवघ्या 60 रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा घात; गोंदिया हादरलं…

619 0

गोंदिया : माणूस एखाद्या शुल्लक गोष्टीचा राग मनात धरून कधी काय करेल याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय या प्रकरणात आला आहे. गोंदिया (Gondia Crime) जिल्ह्याच्या दवनीवाडा पोलीस ठाणे अंतर्गत बोदा या ठिकाणी ही घटना घडली आहे. ज्यात क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आकाश दानवे (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अल्पेश पटले असे आरोपीचे नाव आहे. उसने घेतलेल्या 60 रुपयांच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे समजत आहे. मृत आकाशने आरोपी अल्पेशकडून 60 रुपये उसने घेतले होते. आरोपी अल्पेश पटले याने आकाशला उसने घेतलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली होती.

अल्पेशने पैसे मागितल्यानंतर आकाशने पैसे संध्याकाळी फोन – पेने पाठवतो, असे सांगितले होते. त्यावर आरोपी अल्पेश पटले याचा विश्वास बसला नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. तितक्यात आरोपी अल्पेश पटले याने आकाश दानवे याचा गळा आवळून तुला खतम करतो असे म्हणून त्यास खाली जमिनीवर पाडून छातीवर मारहाण केली. यामुळे आकाश हा बेशुद्ध झाला. त्यानंतर लगेचच आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा या ठिकाणी दाखल करण्यात आले. तिथून त्याला पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर दवणीवाडा पोलिसांनी आरोपी अल्पेशला या प्रकरणी अटक केली. एका शुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा घात केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Posted by - September 16, 2023 0
मुंबई : अवघ्या काही दिवसांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या गणेशोत्सवानिमित्त सगळीकडं लगबग सुरु झालेली आहे. याची…
Mumbai Satra Court

बेस्ट बेकरी प्रकरणी दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : गुजरातमधील (Gujrat) बेस्ट बेकरी प्रकरणात (The Best Bakery Case) मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निर्णयात…

भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा, १० हजारांचा दंड

Posted by - April 5, 2022 0
अमरावती – राज्याचे माजी मंत्री भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा…

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केली हेल्पलाईन; माहिती पाठविण्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचं आवाहन 

Posted by - March 18, 2023 0
आवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवावी असं…
Bank Fraud

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Posted by - March 31, 2024 0
बुलाढाणा : बुलाढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नांदुरा अर्बन बँकेला कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानेच (Bank Fraud) तब्बल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *