Gondia Crime

Gondia Crime : गोंदिया हादरलं ! पैशांच्या वादामुळे टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

602 0

गोंदिया : गोंदियामधून (Gondia Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया हादरलं आहे. पैशांच्या वादातून एका टोळक्याने तरुणाची निर्घृणपणे हत्या केली आहे. त्याच्यावर कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड आणि काठीनं हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मनीष उर्फ ईश्वर भालाधरे (वय 30 वर्ष रा. कुडवा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील पाच पैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, चौघांचा शोध असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथील एमआयटी कॉलेज जवळ एक 30 वर्षीय तरुणावर पैशांच्या वादातून 5 लोकांनी कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड, तसेच काठीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.मनीष उर्फ ईश्वर भालाधरे (वय 30 वर्ष रा. कुडवा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

संतोष मानकर (वय 50 वर्ष), लकी उर्फ लोकेश मानकर (वय 21 वर्ष), पवन मानकर (वय 23 वर्ष), तुषार हट्टेवार (वय 19 वर्ष) आणि जॉर्डन शेंडे (वय 20 वर्ष) सर्व रा. कुडवा असे आरोपींची नावं आहेत. या सर्व आरोपींनी मिळून मनीषची निर्घृणपणे हत्या केली. 5 आरोपींपैकी एका आरोपीला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर बाकी आरोपींचा शोध सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Raj Thackeray : मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Sharad Mohol Murder : शरद मोहळच्या हत्येचं भादेगाव कनेक्शन आले समोर

Kiran Mane : हाती शिवबंधन बांधत अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Supriya Sule : लवकर उठून कामाला लागणे ही अजित पवारांची स्टाईल, सुप्रिया सुळेंनी केले अजित पवारांचे कौतुक

Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह

Sharad Mohol : शरद मोहळला परत पाठवा भाजपच्या ‘या’ आमदाराने केली प्रार्थना

MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Share This News

Related Post

Pune University Fight

Pune University : पुणे विद्यापीठात राडा; एसएफआय-अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

Posted by - November 1, 2023 0
पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन (Pune University) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार…
Pune Banner

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

Posted by - June 17, 2023 0
पुणे : राज्यात बलात्कार, कोयता गँगची दहशत, वरिष्ठ नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, पत्रकारांना गाडीने चिरडणे, जाती धर्मात जाणीवपूर्वक दंगली…

अंगावर झाड कोसळून नवदाम्पत्याचा मृत्यू

Posted by - April 23, 2022 0
पुरंदर तालुक्यातील सासवड-वीर  रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे झाड अंगावर कोसळल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.…
Pune Acsident

पुण्यातील भोरमध्ये भरधाव पिकअप टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात; 7 मजूर जखमी

Posted by - June 17, 2023 0
पुणे : पुण्याच्या भोरमधील नेकलेस पॉईंटजवळ भरधाव पिकअप टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील 7 मजूर जखमी…

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी 70 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त

Posted by - December 29, 2022 0
पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक बॉक्स साठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *