Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News : अभ्यास करत नाही म्हणून शिक्षकांनी नोंदवहीत केली नोंद; ते पाहून वडील संतापले अन्…

2182 0

छत्रपती संभाजीनगर : आजकाल तरुण पिढीमध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एका शुल्लक कारणावरून ते आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar News) घडली आहे. यामध्ये अवघ्या 12 वर्षांच्या मुलीने वडील अभ्यास कर म्हणल्याने धक्कादायक पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुरा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रणवी उलमाले असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. औरंगपुरा इथं ती कुटुंबियांसोबत राहत होती. प्रणालीच्या शिक्षकांनी तिच्या नोंदवहीत ती अभ्यास करत नसल्याची नोंद केली होती. ती नोंद पाहून वडिलांनी तिला होमवर्क वेळेवर करत जा असं सुनावलं. याचा राग आल्याने प्रणवीने वडील कामावर गेल्यानंतर ओढणीच्या सहाय्याने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

औरंगपुरा भागातील भडाई गल्लीत काल सायंकाळी घडली. बराच वेळेपासून खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने, आजोबांनी दरवाजा तोडला आणि आज प्रवेश केला असता प्रणवी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar : मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी ‘या’ व्यक्तीला करण्यात आली अटक

Posted by - February 9, 2024 0
मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली अटक…
Jalgaon News

Jalgaon News : ‘या’ शुल्लक कारणावरून मामीनेच केला भाच्याचा गेम; जळगाव हादरलं

Posted by - October 1, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्यानं भुसावळमध्ये 31…

नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी

Posted by - May 13, 2022 0
मुंबई- ईडीच्या अटकेमध्ये असलेले मंत्री नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला नसला तरी मुंबई सत्र न्यायालयाने…
Meghna Bordikar

Meghna Bordikar : आमदार मेघना बोर्डीकर यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ जाहीर

Posted by - May 9, 2023 0
परभणी : लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘भारत गौरव पुरस्कार’ (bharat gaurav award) यंदाच्या वर्षी…
FIR

Pune News : RTO कार्यालयामधील राड्याप्रकरणी केशव क्षीरसागर, अजय मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - February 24, 2024 0
पुणे : पुणे (Pune News) आरटीओत तुंबळ हाणामारी करत, राडा घालणार्‍या टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *