Latur Lodge

लातूर हादरलं ! बास्केटबॉलची मॅच पाहणे चिमुकलीच्या बेतले जीवावर; काय घडले नेमके?

658 0

लातूर : लातूरमध्ये (Latur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बास्केटबॉलची मॅच पाहणे एका चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. ही मुलगी लॉजच्या खिडकीमध्ये बसून बास्केटबॉलची मॅच पाहत होती. यादरम्यान तिचा अचानक तोल गेला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली, मात्र खाली पडताना ती विजेच्या तारेवर कोसळली आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. अद्या देशपांडे (Adya Deshpande) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. ती 11 वर्षांची होती. मूळची ती हैदराबादची (Hyderabad) रहिवाशी होती.

काय घडले नेमके?
अद्या आपल्या मावशीसोबत लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आली होती. दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर त्या दोघी लॉजवर आल्या. लॉजवर आल्यानंतर अद्या खिडकीतून बाहेर पाहत होती. या लॉजच्या शेजारीच जिल्हा परिषदेचं ग्राऊंड आहे, त्या ग्राऊंडवर बास्केटबॉलची मॅच सुरु होती. तिला ती मॅच पाहण्याची इच्छा झाली. त्यामुळे ती खिडकीजवळ जाऊन बसली होती. खिडकी लॉक आहे निघणार नाही या विश्वासावर ती खिडकीला टेकून बसली होती. मात्र अचानक खिडकी उघडली गेली. त्यामुळे अद्याचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. याच खिडकीच्या खालून विजेची तार गेली गेली आहे. आधी ती त्या तारेवर पडली नंतर खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत अद्याचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंब लातूरकडे रवाना
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच अद्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. ते तातडीने हैदराबादकडून लातूरला निघाले आहेत.

Share This News

Related Post

वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे बाहेर उडाले नाहीत – जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Posted by - October 4, 2022 0
पुणे : नुकत्याच (३० सप्टेंबर रोजी) झालेल्या वादळी पावसादरम्यान वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले…
Palghar News

Palghar News : पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध ; प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल

Posted by - April 17, 2024 0
पालघर : पालघर (Palghar News) लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय कार्यालयाचे…

उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; जगदीप धनकड की मार्गरेट अल्वा कोण मारणार बाजी?

Posted by - August 6, 2022 0
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज (ता.6 ऑगस्ट) मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गरेट अल्वा…

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ‘ऐश्वर्य कट्ट्याचा’पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

Posted by - October 17, 2022 0
पुणे : प्रत्येक वेळी मान्यवरांच्या उपस्थितीने रंगणाऱ्या ऐश्वर्या कट्ट्यावर आज एक वेगळीच रौनक आलेली होती. उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *