Gadchiroli News Murder

Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या

349 0

गडचिरोली : तिहेरी हत्याकांडामुळे गडचिरोली (Gadchiroli News) हादरलं आहे. यामध्ये नातीसह आजी-आजोबांची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरी या ठिकाणी घडली आहे. हत्या नेमकी का करण्यात आली? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
देवू दसरू कुमोटी (60), बिच्चे देवू कुमोटी (55) व अर्चना रमेश तलांडे (10), अशी हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अर्चना ही देवू यांच्या मुलीची मुलगी होती. ती एटापल्ली तालुक्यातील मरकल येथील राहणारी होती. ती सुट्टीत आजी-आजोबांकडे आली होती. बुधवारी हे तिघेही गावाजवळच्या शेतात रात्रीपासून मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी एका ग्रामस्थाला त्यांची हत्या झाल्याचे दिसले. त्याने तत्काळ गावकऱ्यांसह बुर्गीच्या (कांदोळी) पोलिसांना माहिती दिली. अर्चनाच्या चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत; तर देवू आणि बिच्चे या दोघांना हातोडीने वार करून ठार मारण्यात आले आहे. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. ही हत्या नेमकी कुणी केली, संपत्तीचा नेमका वाद काय होता किंवा कुणासोबत होता याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

‘ही घटना संपत्तीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. योग्य तो तपास करून आरोपींना जेरबंद केले जाईल,’ अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात अशीच एक खळबळजनक घटना घडली होती. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार जिल्ह्यातून समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…

Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक

UPI Transaction Limit : गूगल-पे, Paytm वापणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने ‘या’ नियमांत केले बदल

Share This News

Related Post

CM EKNATH SHINDE

कार्तिकी एकादशी : महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 3, 2022 0
मुंबई : ‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे. अन्नदाता शेतकरीराजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात…

चांदिवाल आयोगाची देशमुखांना क्लिनचिट ? 100 कोटींच्या वसुलीचे आरोप खोटे

Posted by - April 26, 2022 0
मुंबई – चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…

7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; मोदी सरकारचे नवीन आदेश

Posted by - October 31, 2022 0
नवी दिल्ली : सरकारने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. अशातच आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश…
RBI

RBI : मे महिन्यात १२ दिवस बँकांचे काम राहणार ठप्प; RBI ने जाहीर केली यादी

Posted by - April 23, 2024 0
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या यादी नुसार मे महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये…
Pune Accident

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 1, 2023 0
दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील (Pune Accident) उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या हद्दीत आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकीचा भीषण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *