Gadchiroli Murder Case

Gadchiroli Murder Case : गडचिरोलीतील ‘त्या’गूढ हत्येचं रहस्य उलगडलं; ‘या’ कारणामुळे सुनेनंच घडवून आणलं हत्याकांड

539 0

गडचिरोली: गडचिरोलीमधील (Gadchiroli Murder Case) महागाव येथील एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश आलं आहे. या पाच लोकांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. हत्यारे दुसरे तिसरे कुणी नसून सून आणि मेहुण्याची पत्नी आहेत. आपल्या वडिलांच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचे सुनेकडून सांगण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
20 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी आणि त्यानंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचारकामी भरती करण्यात आले. परंतु दिनांक 26 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व दिनांक 27 सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नी सौ. विजया कुंभारे यांचा लागोपाठ दिवसात मृत्यू झाला. त्या धक्क्यातून सावरत असताना अचानक त्यांची गडअहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर व मुलगा रोशन कुंभारे यांची तसेच शंकर कुंभारे यांची मुल येथे राहणारी साली आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. अनेक औषध उपचार करुन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामध्ये दिनांक 8 ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे व दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रोशन कुंभारे याचा मृत्यू झाला.

शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना अहेरी येथून चंद्रपूर येथे उपचारासाठी नेणारा त्यांच्या कारचा चालक राकेश मडावी याची देखील दुसऱ्या दिवशीपासून प्रकृती बिघडल्याने त्याला देखील चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच नातलग भरती असल्याने त्यांना मदतीच्या उद्देशाने शंकर कुंभारे यांच्या सालीचा मुलगा चंद्रपूर व नागपूर येथे आल्याने त्याची देखील प्रकृती बिघडल्याने त्यालादेखील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तीनही व्यक्तींची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मृत्यू पावलेल्या पाच व्यक्ती व सध्या उपचार घेत असलेल्या तीन व्यक्तींनमध्ये हातापायाला मुंग्या येणे, कंबरेखालील भागामध्ये व डोक्यामध्ये प्रचंड वेदना व ओठ काळे पडून जीभ जड पडणे यासारखे एकसमान लक्षणे दिसून आली.

एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या अल्पावधीत झालेल्या गुढ मृत्यूंमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरुन भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली तेव्हा शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे व साल्याची पत्नी रोझा रामटेके यांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर आली. त्यावरुन त्या दोघींच्याही हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवुन त्यांना आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता, त्या दोघींनी गुन्हा केल्याचे कबूल केले.

सुनेने दिली गुन्ह्याची कबुली
महिला आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याच्याशी तिच्या आई वडिलांच्या विरोधात जावून लग्न केले व या कारणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. तसेच याबाबत पती रोशन व सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत. तसेच सहआरोपी रोझा रामटेके हिने तिच्या सासऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणी हिस्सा मागून नेहमी वाद करत असल्याच्या कारणावरुन त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे परिवार आणि त्यांचे नातलागांना विष देऊन जिवे ठार मारण्याचा प्लॅन बनवला.

ठरलेल्या प्लॅनप्रमाणे रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जावून विष आणले आणि ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये मिसळून त्यांना खाण्यास दिल्याने त्या विषाचा हळुहळु परिणाम होवून त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरवात झाली. त्यात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांचे परिवारातील नव्हता. परंतु तो त्यांच्या गाडीतील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्याने विषबाधा होवून तो आजारी पडला.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर अप क्र. 374/2023 कलम 302, 307, 328, 120 (ब) व 34 भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही महिला आरोपी यांना आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्यात आणखी काही लोकांचा समावेश आहे का? या अनुषंगानेदेखील पोलीस तपास करत आहेत.

Share This News

Related Post

nitesh rane

संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार’, नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य

Posted by - May 7, 2023 0
मुंबई : संजय राऊत आणि राणे कुटुंब यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. यादरम्यान आता भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे…
Solapur Crime

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Posted by - January 30, 2024 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime) वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाने आपल्या वडिलांकडे मोबाईल…
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांनी व्यक्त केली ‘ती’ भीती; म्हणाले…

Posted by - May 8, 2024 0
अहमदनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली. या सभेला शरद पवार…

अहमदनगरमधील घोडेगाव येथे राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

Posted by - April 30, 2022 0
अहमदनगर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला सभेसाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. अहमदनगरमधील घोडेगावजवळ हा अपघात…

ईडीच्या कारवाईबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली, म्हणाले, ” गां XX दम असेल तर…

Posted by - May 21, 2022 0
अमरावती – राज्यात सध्या अनेक नेत्यांच्या विरोधात ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईवरून भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *