Gondia News

Gondia News : गोंदिया हादरलं! विद्युत मोटर विहिरीत सोडताना शॉक लागून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

433 0

गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Gondia News) विहिरीमध्ये पाण्याची मोटर टाकत असताना शॉक लागून 4 जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिरोडा तालुक्यातील सरांडी गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. सचिन गिरधारी साठवणे, सचिन भोंगाळे, प्रकाश भोंगाळे आणि महेंद्र राऊत अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. एकाच वेळी गावातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

काय घडले नेमके?
सचिन गिरधारी साठवणे हे आपल्या विहीरीत विद्युत मोटर टाकत होते. त्यावेळी त्यांना शॉक लागला आणि ते विहिरीत कोसळले. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेले सचिन भोंगाळे आणि प्रकाश भोंगाळे या काका पुतण्याचा देखील विहीरीत पडून मृत्यू झाला. यादरम्यान या सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारीच असलेल्या महेंद्र राऊत यांनी विहिरीकडे धाव घेतली आणि ते या तिघांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरले मात्र त्यानाही विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Buldhana News : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

संपूर्ण गावावर शोककळा
एकाच गावातील चार जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या विहीरीमध्ये गॅस आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक : कॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली बारावीच्या मुलींची अंतरवस्त्रे देखील तपासली; भीतीने विद्यार्थिनींचा परीक्षा देण्यास नकार, काय आहे प्रकरण ? वाचा सविस्तर

Posted by - February 24, 2023 0
भंडारा : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. एकीकडे प्रश्नपत्रिका मधील चुका आहेत. तर दुसरीकडे जोरदार कॉपीमुक्त अभियान देखील राबवले जात…

जिल्हा नियोजन समितीची बैठक : पुणे शहरातील 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करणार – पालकमंत्री

Posted by - October 17, 2022 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक…

महत्त्वाची बातमी : विधानसभा पाच आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

Posted by - November 5, 2022 0
निवडणूक आयोगाने विधानसभेच्या पाच आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक तारीख जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुका 5…

#PUNE FIRE : मंगळवार पेठमध्ये फर्निचरच्या दुकानात आगीची घटना

Posted by - February 25, 2023 0
पुणे : मंगळवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौकानजीक फर्निचरच्या दुकानात आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 5 वाहने दाखल झाली त्यानंतर…

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब

Posted by - March 23, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मुंबईच्या कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये दुसर्‍यांदा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *