accident

देवीच्या दर्शनाहून परतत असताना कुटुंबावर काळाचा घाला; 4 जणांचा जागीच मृत्यू

12329 0

सांगली : आज सकाळी सांगलीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. विटा नेवरी रोडवर हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व कुटुंब देवीचं दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते. यामध्ये कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काय घडले नेमके?
अपघातग्रस्त ट्रॅव्हल विट्याहून साताऱ्याला जात होती. तर कार साताऱ्याहून विट्याच्या दिशेने येत होती. यावेळी कार भरधाव वेगात होती. यादरम्यान अचानक कार चालकाला झोप लागली अन् त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. शिवाजी नगरच्या पुढे विटा महाबळेश्वर राज्य मार्गावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये तासगाव तालुक्यातील गवाण येथील काशीद कुटुंब ठार झालं. मृत व्यक्तींमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश होता.

या भीषण अपघातात चंद्रकांत काशीद, त्यांची पत्नी सुनीता काशीद आणि मेव्हणा अशोक यांच्यासह कारचालक जागीच ठार झाले. तर सदानंद काशीद यांनी एअरबॅग उघडल्यामुळे थोडक्यात बचावले आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या अपघातानंतर घटनस्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 

Share This News

Related Post

महाविकास आघाडी भक्कम आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. – जयंत पाटील

Posted by - March 11, 2022 0
काल घोषित झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेवटी विजय हा विजयच असतो,…
uddhav thackeray

…तर महाराष्ट्र पेटवून टाकू; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Posted by - May 6, 2023 0
रत्नागिरी : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल होताच…
Pune News

Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा

Posted by - May 25, 2024 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. पोलिसांनी आता…
Nanded News

Nanded News : परभणीतील चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रूरपणे हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

Posted by - September 9, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय…
Kolhapur Crime

Kolhapur Crime : माझा तिने फक्त वापर केला… म्हणत एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

Posted by - August 24, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Kolhapur Crime) एकतर्फी प्रेमातून अपयश आल्याने एका तरुणाने आत्महत्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *