Pradip Shrama

Pradeep Sharma : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा दोषी; ‘त्या’ प्रकरणी न्यायालयाने सुनावली जन्मठेप

593 0

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने मुंबई हायकोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी या 2006 मध्ये दाखल केलेल्या 16 अपीलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता तो आज जाहीर करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण?
2006 मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं. लखन भैया (33, रा. वसई), खरे नाव रामनारायण गुप्ता, त्याच्याविरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैय्याचा मृत्यू पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे चकमकीत झाला. या कथित बनावट चकमकीचे नेतृत्व माजी प्रदीप शर्मा यांनी केले होते.

रामनारायणचे वकील असलेले भाऊ अ‍ॅड.रामप्रसाद गुप्ता यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे एसआयटी चौकशीअंती खटला भरण्यात आला. त्यानंतर सुनावणीअंती सत्र न्यायालयाने सन 2013 मध्ये 11 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तर प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवले होते. शर्माला निर्दोष ठरवण्याच्या निर्णयाविरोधात रामप्रसाद गुप्ता आणि राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात अपील केले होते; तर दोषी 11 पोलिसांनी जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अपील केले होते. याविषयीच्या एकत्रित सुनावणीअंती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी प्रदीप शर्माला दोषी ठरवत हा निर्णय दिला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : धक्कादायक ! पोटच्या मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का; ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Jyoti Mete : ज्योती मेटे पुण्यात शरद पवारांच्या भेटीला; बीडमधून उमेदवारी मिळणार?

Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब

BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट

Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune News : आगामी काळात रा.स्व. संघ ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर आधारित काम करणार प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव

Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक

Dandasana : दंडासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

पुणे महापालिकेवर भगवा फडकवून बंडखोरांना उत्तर द्यायचंय -सचिन अहिर

Posted by - July 24, 2022 0
पुणे: आगामी महापालिका निवडणुकीमध्ये जोमाने काम करून पुणे महापालिकेवर भगवा फडकवून बंडखोरांना उत्तर द्यायचे आहे. पुणे शिवसेनेकडून ही भेट शिवसेना…
Mumbai News

Mumbai News : मंत्रालयामध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून वडापाव विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : मुंबईतील मंत्रालयामधून एक धक्कादायक घटना (Mumbai News) समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून…
Lady Teacher Died

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Posted by - March 3, 2024 0
बरेली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना (Lady Teacher Died) समोर आली आहे. यामध्ये खासगी शाळेतील शिक्षकेचा मृतदेह…
Train Accident In Bangladesh

Train Accident In Bangladesh : बांगलादेशमध्ये ट्रेनचा भीषण अपघात; 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी

Posted by - October 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेशमध्ये (Train Accident In Bangladesh) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या…
Supriya Sule

Supriya Sule : राष्ट्रवादीमध्ये फूट नाही म्हणत सुप्रिया सुळे यांनी ‘त्या’ चर्चांना दिला पूर्ण विराम

Posted by - August 25, 2023 0
पुणे : अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *