Tushar Arothe Arrested

Tushar Arothe Arrested : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना अटक

643 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे (Tushar Arothe Arrested) यांना वडोदरा पोलिसांनी 1 कोटी रुपये रोकडसह अटक केली आहे. वडोदरा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

आरोठे यांच्याबद्दल संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. छाप्यातून 1.01 कोटी अशी नोंद असलेली ‘ग्रे बॅग’ जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबद्दल आरोठे हा पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही. त्यामुळं त्याच्यावर आणि इतर दोन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत रायपतवार आणि अमित जनित अशी इतर दोन आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडं 38 लाखांची रोकड सापडली आहे.

या अगोदरदेखील झाली होती कारवाई
तुषार आरोठे याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिल 2019 मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यावर सट्टेबाजी केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या 19 लोकांमध्ये आरोठे याचाही समावेश होता. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

कोण आहे तुषार आरोठे?
तुषार आरोठे हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक आहे. 2017 मध्ये ICC महिला विश्वचषक अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून त्यानं काम पाहिलं होतं. आरोठे हा स्वत: क्रिकेटपटू होता. क्रिकेट कारकीर्दीत बडोदा संघासाठी त्यानं 51 लिस्ट-ए सामने आणि 114 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, त्यानं बडोद्यासाठी 225बळी घेतले आहेत. तर, त्याच्या नावावर 6,105 धावा आहेत. हा अष्टपैलू खेळाडू 2003 मध्ये निवृत्त झाला. 2008 मध्ये भारतीय महिला संघाच्या कोचिंग स्टाफचा सदस्य झाला. 2018 मध्ये काही अनपेक्षित घडामोडींनंतर त्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

Threats to kill Modi : खळबळजनक ! योगींनंतर आता मोदींना जीवे मारण्याची धमकी

Email Hack : विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन ‘त्या’ आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

5 Years Old Boy Died : हृदयद्रावक ! एक चुक घडली अन् क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह ! नवले पुलावर मद्यधुंद डंपर चालकाने महिलेला उडवलं

Posted by - June 2, 2024 0
पुणे : पुण्यातून पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्हची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन आरोपीने आपल्या भरधाव पोर्शे कारनं…
Akola News

Akola News : सगळ्यांना वाटलं चिमुकलीचा आकस्मित मृत्यू झाला; मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सर्वच हादरले!

Posted by - September 6, 2023 0
अकोला : अकोला जिल्ह्यातून (Akola News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा…
IND vs AUS Final 2023

WC Final : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर

Posted by - November 19, 2023 0
अहमदाबाद : विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याला (WC Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात…
accident

बाजारातून घरी जात असताना टिप्परखाली येऊन शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 26, 2023 0
गोंदिया : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. अशीच एक अपघाताची (Accident) घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यात घडली आहे. यामध्ये…
Crime News

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Posted by - March 6, 2024 0
पाटणा : बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजप आमदाराच्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या (Crime…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *