Firing

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगारावर गोळीबार

725 0

पुणे : पुण्यामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला आहे. वानवडी पोलिस स्टेशनच्या (Wanwadi Police Station) हद्दीतील महंमदवाडी रोडवर ही गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीवरुन आलेल्या एकाने सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात हा सराईत गुन्हेगार जखमी झाला आहे. पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख (वय 21, रा. सय्यदनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

ही गोळीबाराची घटना महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. या गोळीबारा प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पच्चीस शेख याच्या पोटात गोळी घुसल्यामुळे तो जखमी झाला आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचार सुरु आहेत. गुलाम दौस खान असे आरोपीचे नाव आहे. पच्चीस ऊर्फ फैजान शेख (Faizan Shaikh) हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर Sr PI Pratap Mankar(खंडणी विरोधी पथक-2 Anti Extortion Cell Pune (AEC Pune), वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, (Sr PI Bhausaheb Patare), वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat), वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम (Sr PI Ulhas Kadam) यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस अंमलदारांनी भेट दिली व पुढील तपासाला सुरुवात केली.

Share This News

Related Post

Breaking ! पुणे विमानतळावर विमानाचा टायर फुटला; विमानसेवा विस्कळीत

Posted by - March 30, 2022 0
पुणे – लोहगाव विमानतळावरून जाणाऱ्या एका विमानाचा टायर फुटल्याची घटना आज (बुधवार)दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर..; मनोज जरांगे यांनी दिला इशारा

Posted by - January 30, 2024 0
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अध्यादेशाल विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार असा मोठा इशारा मनोज…
Pune News

Pune News : ‘हर घर मोदी परिवार’ अभियानात भाजपच्या 10 हजार कार्यकर्त्यांचा सहभाग

Posted by - April 7, 2024 0
पुणे : भाजपच्या 44व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘हर घर मोदी परिवार’ या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या…
Sassoon Hospital

Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये पुन्हा बिघाड; डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकले

Posted by - November 18, 2023 0
पुणे : ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट पुन्हा एकदा बिघडली आहे. यामध्ये डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकल्याची माहिती समोर…

खातेवाटप झालं आता बंगला वाटप! कोणत्या मंत्र्याला कोणता मिळाला बंगला

Posted by - August 23, 2022 0
मुंबई: राज्यातील अभूतपूर्व सत्ता नाट्य नंतर अखेर 30 जूनला शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्टला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *