Journalist Hanme

खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला पकडताना गोळीबार

358 0

पुणे : पुण्यातील खराडीमधील इन ऑन आयटी पार्क (Inn on IT Park) या ठिकाणी सॉफ्टवेअरचा व्यवसाय (Business of Software) करणार्‍याकडे 5 कोटी रूपयांची खंडणी (Extortion) करण्यात आली. यानंतर ही खंडणी मागणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांच्या अंगावर आरोपींनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.18) दुपारी चारच्या सुमारास पाटस टोल नाक्याजवळ (Patas Toll Plaza) घडली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तथाकथित पत्रकारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महेश हनमे (Mahesh Hanme) याच्यावर सोलापूर येथे बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणी पोलिसांनी महेश सौदागर हनमे Mahesh Saudagar Hanme (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमे (Dinesh Hanme) यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी पुण्यातील खराडी परिसरातील एका व्यवसायिकाकडे 5 लाखाची खंडणी मागितली होती. या खंडणीची तक्रार दाखल होताच आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस गेले असता खंडणी बहाद्दरांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.यानंतर प्रसंगावधान राखत गुन्हे शाखेतील पोलिसांनी आरोपींवर केला असता गोळी गाडीच्या पाठीमागील चाकांवर लागली. या आरोपींमधील महेश हनमे याच्यावर सोलापूर येथे बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल आहे,

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),अप्पर आयुक्त रामनाथ पाकळे (IPS Ramnath Pokale),पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr PI Pratap Mankar), पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan) आणि इतर पोलिस अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Posted by - July 28, 2022 0
पुणे : निवडणूक प्रक्रियेतील अनुभवाची देवाणघेवाण व भविष्यातील नियोजन करताना तसेच निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी उप जिल्हा…
Thar

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! थेट ‘थार’ ला नांगर जोडून केली नांगरणी

Posted by - June 13, 2023 0
आजकाल शेतीदेखील आधुनिक पद्धतीने करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पुण्यातील इंदापूरात एका शेतकर्‍याने गजब फंडा आजमावत चक्क थार च्या साथीने…
Accident News

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Posted by - April 21, 2024 0
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बर्निंग बसचा (Accident News) थरार पाहायला मिळाला आहे, प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लखनौमध्ये जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला बुलेटप्रूफ कार

Posted by - April 8, 2023 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह विशेष अयोध्या दौरा करत आहेत. या दौऱ्याची खूप चर्चा आहे. आज मुख्यमंत्री…
Punit Balan

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Posted by - April 30, 2024 0
पुणे :  भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *