anil Ramod

Anil Ramod Suspended : अखेर ! लाचखोर अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड निलंबित

402 0

पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना अखेर निलंबित (Anil Ramod Suspended) करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या वतीने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागच्या आठवण्यात त्यांच्यावर निलंबनाची (Anil Ramod Suspended) कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. अखेर राज्य सरकारने या प्रस्तावावर निर्णय घेत अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना निलंबित केले आहे.

पुण्यात अतिरिक्त महसूल आयुक्त अनिल रामोड यांना अटक; घरात सापडली तब्बल ‘इतक्या’ कोटींची रक्कम

काय आहे आदेशामध्ये?
रामोड यांच्या निलंबनानंतरही त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसायदेखील करू नये. तसेच, विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, असे निलंबनाच्या (Anil Ramod Suspended) आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रामोड कुटुंबीयांच्या खात्यात 47 लाखापेक्षा जास्त रक्कम; CBI तपासात आले समोर

नेमके काय आहे प्रकरण?
पुण्यातील महसूल विभागतील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना 9 जून रोजी 8 लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना सीबीआयने (CBI) रंगेहाथ पकडले होते. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ (CBI DIG Sudhir Hiremath) यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली होती.

Share This News

Related Post

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेतून महेश मांजरेकरांचे बॅक आऊट ; आता हा अभिनेता करणार दिग्दर्शन …

Posted by - September 20, 2022 0
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या आठवड्यात सुरू होते आहे. परंतु चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश…

OBC Political Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे-फडणवीस यांचे अभिनंदन -जगदिश मुळीक

Posted by - July 21, 2022 0
पुणे : राज्यात नुकत्याच सत्तेवर आलेल्या भाजपा – शिवसेना सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळाले आहे. ओबीसी…

‘एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल’, माजी मंत्री तानाजी सावंत यांचे राष्ट्रवादीवर टीकास्त्र

Posted by - March 28, 2022 0
सोलापूर- निधी वाटपावरून शिवसेनेतील खदखद पुन्हा एकदा बाहेर पडली आहे. अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक निधी दिल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे माजी मंत्री…

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी पिंपरीत जाहीर विराट सभा

Posted by - October 11, 2022 0
पुणे : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त 15 ऑक्टोंबर 2022 रोजी पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स (एच.ए) च्या प्रंचड मोठे असणाऱ्या मैदानात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *