Sangli Crime

Sangli Crime : चादर धुण्यासाठी तलावाकडे गेले अन्.. सांगलीत बाप -लेकाचा दुर्दैवी अंत

449 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडी या ठिकाणी घडली आहे. राजेंद्र आप्पाणा चव्हाण (वय 47) आणि मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय 17) अशी मृत्यू झालेल्या बाप लेकांची नावे आहेत.

काय घडले नेमके?
घरातील चादरी धुण्यासाठी राजेंद्र चव्हाण मुलगा कार्तिकला घेऊन गावातल्या तलावावर गेले होते. यावेळी चादरी धुण्यासाठी तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघे बाप-लेक पाण्यात बुडाले. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस आणि H.E.R.F रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या टीमकडून रात्री उशिरापर्यंत बाप – लेकाचा शोध सुरु होता. रात्री उशिरा या दोघांचे मृतदेह शोधण्यात टीमला यश आले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तलावात चादरी धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : भुजबळांच्या बीडच्या सभेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - August 28, 2023 0
पुणे : रविवारी बीडमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाची सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष…

‘महाराजांचा गैरसमज झाला आहे…. ‘ इंदुरीकर महाराजांच्या टीकेला गौतमी पाटीलचे उत्तर

Posted by - April 5, 2023 0
गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो.…
LPG Gas

गॅस सिलिंडरच्या दरात बदल! ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त झाला सिलेंडर

Posted by - June 1, 2023 0
मुंबई : सगळीकडे महागाई (Inflation) वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट (Budget) ढासळत आहे. त्यातच आता सर्वसामान्य लोकांना थोडासा दिलासा मिळणारी बातमी…
Bajirao Khade

Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन

Posted by - April 24, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बंडखोरी केलेले काँग्रेसचे (Congress) माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला खेड-आळंदी मतदारसंघातील कामांचा आढावा

Posted by - November 28, 2023 0
मुंबई : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *