Jalna Crime

Jalna Crime : जालना हादरलं ! अधिकच्या महिन्यात सासरा अन् मेहुण्याने केली जावयाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

814 0

जालना : जालनामध्ये (Jalna Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण जालना (Jalna Crime) शहर हादरलं आहे. यामध्ये सध्या अधिकचा म्हणजे धोंड्याचा महिना चालू आहे. चालीरीतीमुळे या महिन्यात लेक जावयाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. जावयाला दान देत मुलगी आणि जावयाला धोंडे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. पण, या महिन्यात मेव्हणे आणि सासऱ्याने आपल्या जावयाचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
कृष्णा धोंगडे (वय 40) असे मृत जावयाचे नाव आहे. त्यांचे शहरातील सेलू रोडवर औषधाचे दुकान आहे. धोंगडे आणि त्यांचे सासरे संशयित नरहरी रोकडे, मेहुणा पांडुरंग रोकडे, पवन रोकडे यांच्यात शेतातील पाण्याचा वाद सुरू होता. हा राग टोकाला गेल्याने अखेर सासरे आणि मेव्हण्याने जावयाची हत्या करायचे ठरवले. 8 ऑगस्टच्या रात्री 10 वाजता कृष्णा धोंगडे हे मेडिकल बंद करून त्यांच्या घराकडे जात होते. यादरम्यान शहराबाहेरील साईबाबा मंदिराजवळ संशयित सासरे नरहरी रोकडे, मेहुणा पांडुरंग रोकडे, पवन रोकडे आणि शंकर पतंगे यांनी कृष्णा यांचा रस्ता अडवून खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत कृष्णा धोंगडे गंभीर जखमी झाले. यानंतर त्या ठिकाणच्या काही लोकांनी कृष्णा यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत चौघांना जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत कृष्णा यांच्या माघारी आई, वडील, पत्नी, बहीण, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : वाघोली-केसनंद रस्ता येथे कोणार्क ऑर्चिड ‘या’ बिल्डिंगमधील घराला भीषण आग

Posted by - November 11, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune News) वाघोली-केसनंद रस्ता येथे कोणार्क ऑर्चिड ही 12 मजली बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमधील एका घराला भीषण…
Shrirampur News

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Posted by - November 24, 2023 0
श्रीरामपूर : श्रीरामपूरमधून (Shrirampur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका एजंटने RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.…

मागील वर्ष ठरले रा. स्व. संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष – नाना जाधव

Posted by - March 15, 2023 0
पुणे : मागील वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवले

Posted by - October 30, 2023 0
बीड : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकारण पेटले आहे. मराठा समाजाकडून आता उद्रेक पाहायला मिळत आहे. माजलगावमध्ये ठिकठिकाणी…
Parbhani News

Parbhani News : पतीला भीती दाखवायला गेली आणि स्वतःचाच जीव गमावून बसली

Posted by - September 24, 2023 0
परभणी : परभणीमध्ये (Parbhani News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीला भीती दाखवण्यासाठी गळफास घेण्याचा प्रयत्न करणे एका महिलेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *