sucide Nagpur

क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यामुळे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

1090 0

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका क्षणात संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. यामध्ये क्रिकेट सट्ट्याच्या (Cricket Betting) नादात मोठ्या प्रमाणात रक्कम हरल्यामुळे आर्थिक फटका बसलेल्या एका 20 वर्षीय तरुणाने नैराश्यातून (depression) आत्महत्या (Suicide) केली आहे. यादरम्यान मुलाच्या मृत्यूची बातमी एकताच त्याचे आईने देखील काही तासात विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

काय घडले नेमके?
खितेन नरेश वाधवानी (वय 20 वर्ष) (Khiten Naresh Wadhwani) असे मृत मुलाचे नाव आहे तर दिव्या नरेश वाधवानी (Divya Naresh Wadhwani) असे त्याच्या आईचे नाव आहे. खितेन हा नागपुरातील नामांकित महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. परंतु चुकीच्या संगतीमुळे तो क्रिकेट सट्ट्याकडे वळला. त्याने यावर्षी आपल्या मित्रांच्या सांगण्यावरून आयपीएल सट्ट्यावर पैसे लावू लागला. मात्र यामध्ये त्याला मोठा आर्थिक फटका बसला आणि तो नैराश्यात गेला.

घटनेच्या दिवशी शनिवारी (20 मे) खितेन मध्यरात्री उशिरा घरी पोहोचला, त्यामुळे त्याची आई त्याच्यावर चिडली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब शहरातील आशीर्वाद नगर इथे नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभासाठी गेले होते. यावेळी खितेनने घरी कोण नसल्याचा फायदा घेत घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्याचे कुटुंबीय जेव्हा घरी परतले तेव्हा खितेनचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूच्या 48 तासांनंतर खितेनच्या आईनेदेखील विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

Share This News

Related Post

Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe : आळंदीचा विकास आराखडा तयार करताना भाविकांना केंद्रस्थानी ठेवावे : डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - July 31, 2023 0
आळंदी : भाविकांना केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध विकास आराखडा बनवावा तसेच देवस्थानच्या विकासाकरिता लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम…

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडले ? तापमान नेमकं किती होते ?

Posted by - April 17, 2023 0
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने रविवारी खारघरच्या सेंट्रल पार्कवर गौरविण्यात आले. मात्र, या भव्य कार्यक्रमात ११ जणांचा…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Posted by - June 26, 2023 0
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती…

#PARBHANI : गावाकडे फिरायला जात असताना आजोबा आणि नातवावर काळाचा घाला! दुचाकीला बसने उडवले

Posted by - February 26, 2023 0
परभणी : परभणी मधून एक दुर्दैवी घटना समोर येते आहे. परभणीमध्ये आपल्या आजोबांना गावाकडे घेऊन जात असताना दुचाकीला बसने दिलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *