Chandrababu Naidu Arrest

Chandrababu Naidu Arrest: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना तडकाफडकी अटक

626 0

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक (Chandrababu Naidu Arrest) करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीने त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी आपल्या दौऱ्यादरम्यान नंदयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केलं होतं. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास, नायडू यांना अटक करण्यासाठी एपी सीआयडी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले, परंतु पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश सीआयडीला चंद्राबाबूंना अटक करू दिली नाही. यादरम्यान चंद्राबाबूंच्या टीडीपीचे नेते, कार्यकर्ते आणि आंध्रप्रदेश सीआयडी पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली.

त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. त्याच्या अटकेसाठी 51CrPC अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला. मात्र पोलिसांनी माननीय न्यायालयासमोर तपशील सादर केल्याचं सांगत तपशील देण्यास नकार दिला. नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रिमांड अहवाल देण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं मान्य केलं. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

कोणत्या प्रकरणात करण्यात आली अटक ?
कौशल विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी 1 म्हणून नाव देण्यात आलं आहे, ज्यात 250 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकार्‍यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल विकास प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयानं जारी केलेल्या एफआयआर प्रत आणि इतर आदेशांची माहिती दिली आहे.

Share This News

Related Post

Pune Crime

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

Posted by - February 27, 2024 0
पुणे : पुणे जिल्ह्यात (Pune Crime News) मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यामध्ये तरुण पिढीदेखील गुन्हेगारीमध्ये अडकत चालली…
Jalgaon News

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Posted by - November 28, 2023 0
जळगाव : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. जळगावमधून (Jalgaon News) एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये चाळीसगावच्या…

“शिवसेना नक्की कुणाची ? हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा” शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

Posted by - September 27, 2022 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कुणाची , धनुष्यबाण कोणाचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. शिंदे गटाने शिवसेनेवर…
Loksabha Election

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : शिंदेचे खासदार असलेल्या जागेवर भाजपाचा डोळा

Posted by - June 9, 2023 0
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून नुकतेच लोकसभा आणि विधानसभानिहाय्य निवडणूक प्रमुखांच्या निवडी भाजपकडून करण्यात आल्यात. यामध्ये…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

Posted by - November 23, 2022 0
पुणे : शहरात गेली पाच वर्षे सुरू असलेली, समान पाणीपुरवठा, उड्डाण पूल, रस्ते, पीएमपी बसेस खरेदी, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण आदी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *