Lalit Patil

Lalit Patil : मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं.. ललीत पाटीलचा मोठा गौप्यस्फोट

3266 0

मुंबई : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला 15 दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपी ललित पाटीलचा शोध लागत नव्हता. आज अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. मुंबई पोलिसांनी त्याला तामिळनाडूील चेन्नई येथून अटक केली आहे.

ललित पाटील याला आता मुंबईत आणलं गेलं असून लवकरच कोर्टात सादर करण्यात येणार आहे. ललीत पाटील 300 कोटींची ड्रग्ज फॅक्टरी चालवतो. त्यामुळे त्याचे नेटवर्क देशभरात पसरले आहे. यामुळे पोलिसांना ललित पाटीलला पकडणे खूप कठीण झाले. ललीत पाटीलला अंधेरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. यानंतर त्याला पुणे कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

ललीत पाटील पुण्याहून नाशिकला गेला होता असे समोर येत आहे. नाशिकनंतर तो इंदौरला गेला. इंदौरनंतर तो गुजरात सुरतला गेला. यानंतर तो पुन्हा नाशिकला आला. यानंतर धुळे, संभाजीनगर, कर्नाटक, बंगळूर, चैन्नईपर्यंत प्रवास केला. यानंतर तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता, असे समोर आले आहे. तसेच मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन असा गौप्यस्फोट ललीत पाटीलने केला आहे. ललीत पाटीलला या प्रवासात त्याला कोणी मदत केली, टुरीस्ट गाडी कोणी करुन दिली, त्याच्यासोबत कोण होते? या सर्वांची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. त्याच्या या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

Shivsena

Shivsena Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक; ‘या’ 3 आमदारांनी मारली दांडी

Posted by - June 10, 2024 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक (Shivsena Meeting) बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली ही…

पुणे महापालिकेकडून गुंठेवारी नियमितीकरणाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

Posted by - April 2, 2022 0
पुणे- पुणे महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमितीकरणाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम…

मोठी बातमी ! राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर मंगळवारी होणार सुनावणी

Posted by - May 13, 2022 0
मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर…

#BEAUTY TIPS : चमकदार त्वचेसाठी ग्लिसरीन कसे लावावे, पहिल्या वापरापासून मिळतात चमत्कारिक फायदे

Posted by - March 9, 2023 0
आजच्या काळात प्रत्येकाला चमचमीत त्वचा हवी असते, पण कधी चुकीच्या उत्पादनांचा वापर, जीवनशैलीचा अभाव तर कधी उन्हात राहिल्याने चेहऱ्याची चमकही…
Mumbai - Pune Highway Accident

Mumbai – Pune Highway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरचा भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - August 21, 2023 0
मुंबई : राज्यात अपघाताची (Mumbai – Pune Highway Accident) मालिका सुरूच आहे. ती काही थांबायचे नाव घेईना. आज पुन्हा एकदा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *