Dispute

Dispute : दुचाकीचा धक्का लागल्यानं दोन गटांत तुफान राडा; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

608 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा दोन गटांमध्ये तुफान राडा (Dispute) झाल्याचे पाहायला मिळाले. दुचाकीचा धक्का लागल्यामुळे दोन गटांमध्ये हा तुफान राडा (Dispute) झाला आहे. या राड्यानंतर घरावर दगडफेकसुद्धा करण्यात आली. या दगडफेकीमध्ये चार वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या राड्याप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अंगुरीबाग परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Satara News : ‘खूप केलं माणसांसाठी आता बस्स’… व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

काय घडले नेमके?
विजय काथार हा तरुण अंगणात उभा होता. त्याला सय्यद इरफानच्या दुचाकीचा धक्का लागला. यातून दोघांमध्ये मोठा वाद होऊन भांडण सुरू झालं. काही वेळातच त्या ठिकाणी जमाव जमला. हे भांडण सोडवण्यासाठी आलेला मयूर परदेशी, विजयच्या वहिनी हर्षाली काथार, भाऊजी सुधाकर काथार, सुनीता काथार, योगिता काथार यांनाही जमावाने शिवीगाळ करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर हल्लेखोरांनी काथार यांच्यासह परिसरातील रहिवाशांच्या घरासमोर उभ्या तीन दुचाकींसह एका कारची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणात (Dispute) 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

कात्रज डेअरीसाठी 9 तालुक्यात 100% मतदान ; आज मतमोजणी

Posted by - March 21, 2022 0
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. २०) मोठ्या चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील…
Karuna Munde

Karuna Munde : स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे करुणा मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

Posted by - November 30, 2023 0
बीड : आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा…

‘मकर संक्रांती- भोगी’ चा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा होणार

Posted by - January 10, 2023 0
पुणे : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने राज्य शासनाने ‘मकर संक्रांती- भोगी’ हा सणाचा दिवस दरवर्षी ‘पौष्टिक तृणधान्य दिन’…
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ‘कोयत्या’ची दहशत; तरुणाची थेट कोयता घेऊन कॉलेजमध्ये एंट्री

Posted by - July 2, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune Crime News) सदाशिव पेठेत एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका युवतीवर भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची…

खंडग्रास सूर्यग्रहण 2022 : आज भारतात कुठे आणि किती वेळ दिसणार सूर्यग्रहण ? सुतक काळ, वेळ वाचा सविस्तर

Posted by - October 25, 2022 0
सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्यामध्ये येतो. द्रिक पंचांग यांच्या म्हणण्यानुसार, आज सुतक काल सकाळी 03:17 वाजता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *