Dhule Death

देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे; NDA तील विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

1776 0

धुळे : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा हाडाखेड तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तलावात पोहत असताना मासे पकडण्यासाठी टाकण्यात आलेल्या जाळ्यात पाय अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
शिरपूर येथील दादुसिंग कॉलनी परिसरात राहणारा हिमांशू शरद चौधरी (मुळगाव जापोरा ता. शिरपूर) हा आपल्या मित्रांसोबत शिरपूर तालुक्यातील हाडाखेड पासून दोन ते तिन किमी अंतरावर असलेल्या डॅममध्ये सायंकाळी पोहण्यासाठी गेला होता. यादरम्यान पोहत असताना हिमांशूचा पाय पाण्यात मासे पकडण्यासाठी पसरवलेल्या जाळ्यात अडकला आणि त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच हिमांशूच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुर्णपणे पाण्यात बुडाला होता. यानंतर त्याच्या मित्रांनी हिमांशूच्या वडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर त्याचा तात्काळ पाण्यात शोध सुरु केला असताना रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. विशेष बाब म्हणजे, हिमांशू चौधरी याची काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये निवड झाली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

HDFC

HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 29, 2024 0
मुंबई : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी (HDFC Bank Alert) एक मोठी बातमी समोर आली आहे. बँकेने ग्राहकांसाठी नवीन अपडेट जारी केली…
Santosh Bangar

Hingoli : आमदार बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ‘ती’ कृती पडली महागात

Posted by - August 29, 2023 0
हिंगोली : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि प्रकरणामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या अडचणीमध्ये आता…
Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - August 4, 2023 0
मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या…

#IRCTC टूर पॅकेज : फक्त 19 हजारात मिळवा केरळला जाण्याची संधी, जाणून घ्या टूर पॅकेजशी संबंधित सर्व माहिती

Posted by - March 15, 2023 0
उन्हाळा सुरू होताच लोक सुट्ट्यांचे प्लॅनिंग करू लागतात. अशातच जर तुम्हीही या उन्हाळ्यात तुमची सुट्टी चांगल्या ठिकाणी घालवण्याचा विचार करत…

आजची सर्वात मोठी बातमी : बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर

Posted by - February 7, 2023 0
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून कडू राजकारणाला झालेली सुरुवात मोठ्या विघ्नाकडे वाटचाल करते आहे. काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांमधील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *