Crime

धुळे पोलिसांची मोठी करवाई; चार जणांकडून जप्त केल्या 90 तलवारी

340 0

मुंबई-आग्रा हायवेवर सोनगीर पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र.एमएच ०९ सीएम ००१५ला सोनगीर पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून सदर गाडी थांबवून विचारणा केली. त्यांनतर गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता पोलिसांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. गाडीत तब्बल ९० तलवारी आढळून आल्याने सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींच्या सोबत ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहे.

 

ताब्यात घेतलेल्या आरोपी हे चित्तोडगड येथून ९० तलवारी जालना येथे घेऊन जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, यामागील त्यांचा हेतू काय होता व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा तपास सध्या धुळे पोलीस करीत असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सदर कारवाईत सोनगीर पोलिसांनी ७ लाख १३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील अधिक तपास सोनगीर पोलीस करीत आहे. सदरची कारवाई सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पथकासह पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व विभागीय पोलिस उपअधीक्षक प्रदीप माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

Share This News

Related Post

Sharad Mohol

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Posted by - January 6, 2024 0
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद…
Kolhapur Accident

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 18, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापुरमधून एक भीषण अपघाताची (Kolhapur Accident) घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बंगळुरु महामार्गावरील वाठार गावाजवळ भीषण…
accident

देवीच्या दर्शनाहून परतत असताना कुटुंबावर काळाचा घाला; 4 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - May 4, 2023 0
सांगली : आज सकाळी सांगलीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. विटा नेवरी रोडवर हा भीषण अपघात झाला. हा…

CRIME NEWS : पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट ; गुन्हा दाखल – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

Posted by - August 25, 2022 0
पुणे जिल्ह्यात फिरत्या मोटारींतून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात खटला…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Posted by - December 25, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तीचे हातपाय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *