Dhule Suicide

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

571 0

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नुकतीच पोलीस भरतीची परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थीनीने तापी नदीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. शिवानी बाळु पाटील (वय 19) (Shivani Balu Patil) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तिने काल गिधाडे येथील तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मृत शिवानीने नुकतीच पोलीस भरतीची परिक्षा दिली होती. मात्र तिने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही.

काय घडले नेमके?
जवखेडा येथील शिवानी पाटील ही तरुणी सकाळी घरून परीक्षेला जाते असे सांगून शिरपूरला गेली होती. मात्र, परिक्षेला न जाता ती थेट गिधाडे गावाजवळील तापी नदीच्या पात्रजवळ गेली आणि त्या ठिकाणी तिने नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. तापी नदीपात्रात उडी घेतल्यानंतर काही लोकांनी तिला बुडताना पाहिले. यानंतर त्यांनी तातडीने नदीत उडी घेऊन शिवानीला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर तिला त्वरित शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

शिवानी घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजता जवखेडा येथून परीक्षा देण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेली होती. मात्र ती परीक्षा केंदावर न जाता गिधाडे येथील तापी नदीपात्रावर गेली आणि त्या ठिकाणी तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. शिरपूर पोलिस (Shirpur Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

साध्या पत्रकाराकडे एवढे पैसे आले कुठून ? संजय राऊतांच्या ईडी कारवाईवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

Posted by - July 31, 2022 0
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी…

अखेर ठरलं! महादेव जानकर परभणीतून लढवणार लोकसभा निवडणूक

Posted by - March 30, 2024 0
माझी पशुपालन व दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 24 मार्च रोजी महायुतीमध्ये राहण्याचा निर्णय जाहीर…

HEALTH WEALTH : हिवाळ्यात बहुगुणी पपई खाल्ल्याने होतात अनेक फायदे, पचनासह हृदयकार्यही सुधारते

Posted by - January 30, 2023 0
HEALTH WEALTH : थंडीत आपली प्रतिकारशक्ती अनेकदा कमकुवत होते. अशा वेळी आपल्या आहारात योग्य बदल करून स्वत:ला निरोगी ठेवणे गरजेचे…
Calcutta_highcourt

Calcutta High Court : तरुण मुलींनी सेक्सच्या भावनेवर नियंत्रण ठेवावं, तर मुलांनी.., हायकोर्टाने तरुण पिढीला दिला मोलाचा सल्ला

Posted by - October 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकाता हायकोर्टाने (Calcutta High Court) एका प्रकरणात फैसला सुनावताना तरुण पिढीला सल्ला देताना म्हटले की,…

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Posted by - April 14, 2022 0
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *