Brijbhishan Singh

दिल्ली पोलिसांनी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध दाखल केली चार्जशीट

398 0

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी कुस्तीपटू गेल्या महिन्यापासून आंदोलन (Wrestler Protest) करत होते. एका अल्पवयीन कुस्तीपटू मुलीसह एकूण 6 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर काही आरोपींविरुद्ध नवी दिल्ली अंतर्गत कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एसआयटी पथकाची स्थापना केली होती.

या प्रकरणी तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंडसह अनेक राज्यांना भेटी दिल्या. त्यांनी आतापर्यंत डझनभर लोकांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या घरी जाऊन देखील त्यांच्या घरात काम करणाऱ्यांचे जबाब नोंदवले होते. ब्रिजभूषण यांच्यावर आरोप करणाऱ्या 6 महिला पैलवानांपैकी चौघांनी पोलिसांना या प्रकरणातील पुरावे दिले आहेत. या महिला पैलवानांनी ब्रिजभूषण यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आता आपली पहिली चार्जशीट सादर केली आहे.

Share This News

Related Post

Mumbai Suicide

Sea Link Suicide : सी लिंकवरून समुद्रात उडी मारणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरून (Sea Link Suicide) 31 जुलै रोजी एका व्यक्तीने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. हेलिकॉप्टरच्या…

‘बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना’; मुलीचा कुत्र्यांसमोर भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

Posted by - June 12, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही शोले हा चित्रपट पाहिला असेलच या चित्रपटामधील ‘बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना’…
Vijay Shivtare

Vijay Shivtare : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा अजित पवारांना विरोध कायम; केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Posted by - March 15, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील अतंर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचा उपमुख्यमंत्री…

भाजपाचं मिशन 45; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्यामागे काय आहे रणनीती

Posted by - August 8, 2022 0
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान बारामती दौऱ्यावर येत असून यावरून शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता…
Sharad Pawar Shirur

Sharad Pawar : शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना स्नेह भोजनाचे निमंत्रण

Posted by - February 29, 2024 0
पुणे : बारामतीत नमो रोजगार मोळाव्याचे आयोजन (Sharad Pawar ) करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *