Chhagan Bhujbal Threat

Chhagan Bhujbal Threat : भुजबळांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

666 0

पुणे : युती सरकारमधील कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना (Chhagan Bhujbal Threat) एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने भुजबळ यांच्या मुंबईतील कार्यालयात फोन करून ही धमकी दिली आहे. या प्रकरणी एकाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal Threat: कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

छगन भुजबळ पुण्यात दौऱ्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास हा धमकीचा फोन करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहित मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव आहे. दारूच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

काय दिली धमकी?
प्रशांत पाटील हा मूळ कोल्हापूर येथील रहिवाशी असून त्याने दारूच्या नशेत छगन भुजबळ यांच्या मुंबईतील कार्यालयात सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फोन केला होता. तो म्हणाला मी प्रशांत पाटील बोलतोय. मला त्यांना मारायची सुपारी मिळालीय, त्यांना उद्या मी मारणार आपण सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगतोय. सुपारी कोणी दिली असं विचारलं असता, दिली अशीच कोणीतरी असंही त्याने सांगितलं. साहेबांनी काय वाईट केलंय तुमचं? त्यांना का मारणार असं विचारलं असता, काय वाईट केलंय ते साहेबांना माहिती असं उत्तर आरोपीनं दिलं. मी सांगून काम करतो म्हणून सांगायचं काम केलं. ठेवा आता, म्हणत त्याने फोन ठेवून दिला. पुणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

PUNE POLICE : पुणे पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Posted by - October 29, 2022 0
पुणे : पुणे पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी…
Winter Session

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Posted by - December 15, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू आहे. हे अधिवेशन दिवसेंदिवस वादळी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना प्रवक्त्यांची बैठक

Posted by - August 3, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *