Crime

कसबा पेठेत दसऱ्याच्या दिवशी स्पीकरच्या आवाजावरून राडा; दोन गटातील आरोपी ताब्यात

126 0

दसऱ्याच्या दिवशी मंडळाच्या स्पीकरच्या आवाजावरुन झालेल्या वादात दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना पुण्यातील कसबा पेठेत घडले. या भांडणात दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्याकाट्या, बांबू आणि तलवारीने मारहाण केल्याचं समोर आला आहे.

ही घटना कसबा पेठेतल्या नटराज मित्र मंडळाच्या शेजारी शनिवारी दसऱ्याच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास घडली. दोन गटांमध्ये राडा झाल्यानंतर या दोन्ही गटांनी पोलिसात धाव घेत आपापल्या बाजूने फिर्याद नोंद केली.

पहिली फिर्याद

पहिली फिर्याद आशिष विजय तारु (वय-३२, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तारू यांचा मित्र तेजस राऊत हा दसऱ्यानिमित्त मंडळातील देवीजवळ प्रसाद वाटत होता. त्यावेळी प्रमोद आगणे नावाचा व्यक्ती तिथे आला. त्याने तेजसकडे बघून ‘तू बाहेरून येऊन आमच्याइथे जास्त शहाणपणा करतोस का ? माझ्याकडे काय बघतोस’, असं म्हणत शिवीगाळ करत तेजसच्या कानाखाली मारली. त्यावेळी मंडळाचे इतर कार्यकर्ते जमून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तू शिव्या का देतोस असायचा बही त्याला विचारला. त्यावेळी संतापलेल्या प्रमोदने घरातून तलवार आणली. मंडळाच्या ठिकाणी असलेल्या महिलांच्या गर्दीत घुसण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने तलवार काढून घ्यायचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला तलवारीने मारून दुखापत करण्यात आली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी प्रमोद बाळासाहेब आगणे (वय-४३, रा. नटराज मित्र मंडळाशेजारी, कसबा पेठ) याला अटक केली आहे.

तर दुसरीकडे प्रमोद आगणे यांच्या पत्नी वनिता प्रमोद आगणे (वय-३५, रा. कसबा पेठ) यांनीही फरासखाना पोलीस ठाण्यात आशिष तारू यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून आशिष तारु, निलेश देसाई (वय-३८), अक्षय तारु (सर्व रा. कसबा पेठ) यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करून काहींना पोलिसांनी अटक केली आहे.

दुसरी फिर्याद

वनिता आगणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आगणे यांच्या घराजवळ नटराज मित्र मंडळाची देवी बसवण्यात आली होती. या मंडळाने नवरात्रीच्या निमित्ताने मोठया आवाजात साऊंड सिस्टिम लावली होती. त्यावर फिर्यादी यांचे पती प्रमोद आगणे यांनी मंडळांच्या व्यक्तींना आवाज कमी करा असे सांगितले. मात्र त्यामुळे चिडलेल्या ललित भोकरे नावाच्या व्यक्तीने प्रमोद आगणे यांना शिवीगाळ केली. तर निलेश देसाई याने फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. पुढे आशिष तारु, निलेश आणि बाबु तारु यांनी प्रमोद यांना लाकडी बांबूने मारहाण केली. ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं दोषी कोण याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Share This News

Related Post

Gadchiroli News Murder

Parbhani Crime : महाराष्ट्र हादरला ! प्रेमाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या लेकीची केली हत्या

Posted by - May 5, 2024 0
परभणी : महाराष्ट्रातील परभणीमधून (Parbhani Crime) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा…
Mumbai Police News

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 25, 2023 0
मुंबई : पोलीस दलातून (Mumbai Police News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा…
Gadchiroli News Murder

Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू

Posted by - June 6, 2024 0
पुणे : पुणे जिल्हात मागच्या काही वर्षांपासून (Pune Crime News) गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत अशीच…
Amravati Crime

Amravati Crime : अमरावती हादरले !पतीने ओलांडल्या सर्व मर्यादा; पत्नीला गॅसवर ठेवलं अन्..

Posted by - February 18, 2024 0
अमरावती : पती – पत्नी म्हंटले कि भांड्याला भांड लागणार. कोणत्या ना कोणत्या कारणाने दोघांमध्ये मतभेद होताना (Amravati Crime) दिसतात.…
Pune News

Pune News : ‘मनसे ताकदीने मोहोळ यांचा प्रचार करणार’ : अमित ठाकरे यांचा विश्वास

Posted by - April 17, 2024 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *