भीक मागण्यासाठी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक

396 0

पुणे – भीक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळवण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलीचं पुण्यातून अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

उषा नामदेव चव्हाण (40, रा. श्रीगोंदा, जि अहमदनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना 23 मे रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात ढोलेपाटील रोडवर एका फुगे विकणाऱ्या महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण झालं होते. ही मुलगी आईसह एका रिक्षात झोपली होती. तेव्हा या मुलीला अलगद उचलून पळवून नेण्यात आले. आरोपींनी मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला शालीने गुंडाळले. पोलिसांनी तब्बल 5 दिवस 250 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी महिलेला हातात असलेल्या पिशवीवरून आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

या पिशवीवर असलेल्या किरकोळ विक्रेत्याच्या नावावरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. किरकोळ विक्रेत्याच्या अहमदनगरमध्ये श्रीगोंदा आणि काष्टी येथे शाखा आहेत. त्यानुसार पोलिसांनी श्रीगोंदा येथे जाऊन खबऱ्यांमार्फत माहिती काढली असता उषा चव्हाण ही मुलगी घेऊन आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडले. अपहरण करण्यात आलेली मुलगी उषा चव्हाणच्या घरात आढळून आली. पोलिसांनी तिची सुखरूप सुटका केली.

वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ, निरीक्षक दीपाली भोसले आणि सहायक निरीक्षक अमोल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलिसांच्या पथकाने हे कारवाई केली.

Share This News

Related Post

पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात आपटी बॉम्बचा स्फोट होऊन पाच वर्षांच्या चिमूकलीचा जागीच मृत्यू

Posted by - February 5, 2022 0
पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरातील वडमुखवाडी येथे आपटी बॉम्बचा स्फोट होऊन पाच वर्षांच्या चिमूकलीचा जागीच मृत्यू झालायं. तर एक मुलगा…

पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; चारजण जखमी

Posted by - November 30, 2022 0
पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. आज बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन…

Chandrakant Patil : विद्यार्थ्यांनी पर्यटन नकाशाचा अभ्यास करून महाराष्ट्र समजून घ्यावा – चंद्रकांत पाटील

Posted by - October 23, 2023 0
पुणे : महाराष्ट्र भूगोल समिती ने तयार केलेले वैविध्यपूर्ण नकाशे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करून आपला…
Medha Kulkarni

मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन; राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - February 14, 2024 0
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *