Crime

सीएनजी पंपावर गर्दी होते या कारणावरून कर्मचाऱ्याला टोळक्याची मारहाण, पुण्यातील घटना

343 0

पुणे – सीएनजी पंपामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा राग मनात धरून टोळक्याने पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना नऱ्हे परिसरातील युवांश गॅस स्टेशन पंपावर आज सकाळी ९ वाजता घडली.

या पंपावर गॅस भरण्यासाठी नेहमीच गर्दी होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच रागातून एका युवकाने पंपावरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. त्याचे पर्यवसान वादात झाले आणि त्यामध्ये या तरुणाने त्याच्या इतर सात ते आठ साथीदारांना बोलावून कर्मचाऱ्याला मारहाण केली.

या मारहाणीत कर्मचाऱ्याच्या कानाला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी धाव घेतली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात घाबरत पसरली होती. सिंहगड पोलीस तपास करत आहेत.

 

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Posted by - April 29, 2024 0
पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक (Pune Crime News) घटना समोर आली आहे. यामध्ये मोबाईलवर गेम खेळत असताना एका नराधमाने 16…

पुणे हादरले ! चाकूचा धाक दाखवून अपहरण.. बलात्कार..नग्न अवस्थेत फोटो आणि मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ६ मित्रांसोबत सामूहिक बलात्कार

Posted by - December 28, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढण्यात आले.…
Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident: ‘समृद्धी’वरील अपघात प्रकरणी आली मोठी अपडेट; बसचालकाविरोधात ‘या’ कलमांतर्गत दाखल केला गुन्हा

Posted by - July 1, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ (Buldhana Bus Accident) आज सकाळी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 25…
Pune News

पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नाझण यांचा सत्कार

Posted by - July 20, 2023 0
पुणे : पुणे शहर पोलिस दलातील अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांनी जीवाची बाजी लावून राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *