Crime News

Crime News : दवाखान्यात घुसला अन् डॉक्टर दाम्पत्यावर… संपूर्ण परिसर हादरला

3096 0

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा या ठिकाणी एक खळबळजनक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये आरोपीने डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला करून स्वतःदेखील आत्महत्या केली आहे. या तिघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर आरोपी तरुणाची प्रकृतीदेखील गंभीर असल्याचे समजत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ही घटना अमरवाड्यातील खामरा रोड या ठिकाणी घडली आहे. गुलाबरा छिंदवाडा येथील रहिवासी शनिवारी दुपारी 2 वाजता सोनू उर्फ प्रिन्स माळवी याने देहरिया क्लिनिकमध्ये पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि येथे बसलेल्या डॉक्टर महेश देहरिया (55) यांच्यावर गोळीबार केला. सोनूच्या रिव्हॉल्वरमधून निघालेली गोळी ही महेश देहरिया यांच्या छातीत लागली, त्यामुळे ते बेशुद्ध पडले. आरोपीने दुसरी गोळी झाडली तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी धावलेली त्यांची पत्नी वंदना देहरिया (50) यांच्या पाठीत गोळी लागली, त्यामुळे त्याही जखमी झाल्या.

यानंतर क्लिनिकमध्ये उपस्थित लोकांना काही समजण्यापूर्वीच आरोपीने स्वत:च्या पायात गोळी झाडून स्वत:लाही गंभीर जखमी केले. ही माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्याचवेळी तिघांनाही रुग्णवाहिकेतून अमरवाडा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथून डॉक्टर दाम्पत्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टर दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Jalgaon Accident

Jalgaon Accident : ओव्हरटेकच्या नादात रिक्षाचा अपघात; 1 ठार तर 7 जखमी

Posted by - August 24, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon Accident) ओव्हरटेकच्या नादात ओमनी गाडीने रिक्षाला धडक दिल्याने…
Election

Election : राजस्थानसह ‘या’ 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर

Posted by - October 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election) आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या…
Nagpur News

Nagpur News : मित्राला वाचवायला गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

Posted by - January 27, 2024 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या अल्पवयीन बहिणीने घरातून पळ काढल्याने डिप्रेशनमध्ये गेलेल्या…
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात तक्रार दाखल

Posted by - November 27, 2023 0
मुंबई : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
Pune News

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Posted by - May 20, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *