Crime News

Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह

481 0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातून एक खळबळजनक (Crime News) घटना समोर आली आहे. दापोलीत समुद्र किनाऱ्यावर बारावीत शिकणाऱ्या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दीक्षा माने असे मृत तरुणीचे नाव आहे. चिपळूणमधील एका महाविद्यालयात तरुणी शिकत होती. शुक्रवारी कॉलेजला जाते असे सांगून दीक्षा गेली मात्र ती परत माघारी परतलीच नाही. हर्णे पाळंदे बीचजवळ कोंडजाईकड्यासमोरील किनाऱ्यावर तिचा मृतदेह आढळून आला.

काय आहे नेमके प्रकरण?
पाळंदे इथले रहिवाशी समुद्र किनाऱ्यावर गेले असता त्यांना मृतदेह दिसला. यानंतर त्यांनी दापोली पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तरुणीच्या पाठीवर बॅग होती पण त्यात काहीही सापडले नाही. शेवटी बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासल्यानंतर दीक्षा मिलिंद माने ही हरवल्याची तक्रार देण्यात आल्याचं पोलिसांना समजलं. मृतदेहाचा फोटो चिपळूण पोलिसांना पाठवून तो मृतदेह दीक्षाचा असल्याची नातेवाईकांकडून खात्री करण्यात आली.

दीक्षा शुक्रवारी सकाळी कॉलेजला जात असल्याचं सांगून निघाली होती. मात्र ती पुन्हा परत आलीच नाही. शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने शेवटी पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यात आली. यानंतर सायंकाळी तिचा समुद्रकिनारी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. शवविच्छेदन अहवालानुसार तिचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

सुसाईड नोट आली समोर
दीक्षाने घरातून जाताना एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती सापडली असून त्यात मी घर सोडून जात आहे. माझा शोध घेऊ नका असं लिहिल्याचं समजते. मात्र तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दीक्षाच्या घरी तिचे आई-वडिल आणि दोन बहिणी आहेत. दीक्षा ही घरातील मोठी मुलगी होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहळला परत पाठवा भाजपच्या ‘या’ आमदाराने केली प्रार्थना

MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Share This News

Related Post

काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा;वाचा नेमके काय घडले…

Posted by - July 8, 2022 0
मध्यप्रदेश: अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा यासह आठ हजार पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा मध्य…
Sanjay Raut

Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका

Posted by - November 30, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता…

लडाख येथील अपघातात साताऱ्याच्या फलटण येथील जवान वैभव भोईटे यांना वीरमरण

Posted by - August 20, 2023 0
देशसेवा बजावत असताना लडाख येथे जवानांच्या गाडीचा अपघातात 9 जवानांना वीरमरण आले.. त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील राजाळे गावचे सुपूत्र…

‘आज तुला जिवंत सोडत नाही’…. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जीवघेणा हल्ला

Posted by - April 11, 2023 0
शाळेचे स्नेहसंमेलन पाहून कारमधून घरी परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून मोटारीवर हल्ला केला. मोटारीतील व्यक्तीला बेदम मारहाण…
Crime

Pune Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! अज्ञात व्यक्तीने नवजात बाळाला फेकले नाल्यात

Posted by - September 15, 2023 0
पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील एम आय डी सी भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत (Pune Crime News) माणुसकीला काळीमा फासणारी घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *