मध्यप्रदेश: अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा यासह आठ हजार पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा मध्य प्रदेशच्या एमएलए न्यायालयाने सुनावली आहे. हे प्रकरण आहे 1996 सालातील…2 मे 1996 मध्ये मतदान अधिकाऱ्याला राज बब्बर यांनी मारहाण केल्याचा आरोप करून या अधिकाऱ्याने वजीरगंज मध्ये एफआरआय दाखल केली होती.राज बब्बर समाजवादी पार्टीचे उमेदवार होते.या तक्रारीनुसार राज बब्बर हे समर्थकांसह मतदान स्थळी घुसले आणि मतदान प्रक्रियेत अडथळा आणला.या शिवाय ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले. यादरम्यान श्रीकृष्ण सिंह राणा आणि पोलिंग एजंट शिव सिंह हे देखील जखमी झाले होते. या प्रकरणी मध्य प्रदेशच्या एमएलए न्यायालयाने राज बब्बर यांना दोन वर्ष तुरुंगवास आणि 8500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
![](https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/07/WhatsApp-Image-2022-07-08-at-2.03.24-PM.jpeg)