Beed Video

Beed Video : कंडक्टर आणि प्रवासी महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

691 0

बीड : गावाकडे अजूनही वाहतुकीचे साधन म्हणून बसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सहसा बसमध्ये (Beed Video) प्रवासादरम्यान गर्दी असते त्यामुळे लोकांमध्ये जागेवरुन किंवा इतर कारणांवरुन भांडण (Beed Video) होतं. अशा अनेक घटना समोर येत असतात.सध्या अशीच घटना समोर आली आहे. यामध्ये कंडक्टर आणि प्रवासी महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काय घडले नेमके?
ही घटना बीडमध्ये घडली आहे. यामध्ये बस का थांबवली नाही असं कारण काढून महिला कंडक्टरला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार बीडच्या धारूर आगारात घडला आहे. सध्या या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाजोगावरून बस (एमएच 20, बीएल 125) धारूर आगारात आली असता महिला प्रवाशाने कंडक्टरला ‘अंबाजोगाईत बस का थांबवली नाही’ यावरून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी कंडक्टर संगीता दिनकर कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपी वैशाली अशोक चिरके (रा.जहागीरमोहा, ता.धारूर) यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

संभाजीराजे छत्रपती हा विषय आमच्यासाठी संपलाय- संजय राऊत

Posted by - May 25, 2022 0
मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंना शिवसेनेची 42…

औरंगजेबाची कंबर पाच दिवसांसाठी बंद, पुरातत्व विभागाने घेतला निर्णय

Posted by - May 19, 2022 0
औरंगाबाद- औरंगाबाद येथील खुल्ताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व…
Narhari Zhirval

नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत केला डान्स (Video)

Posted by - May 21, 2023 0
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) हे स्पष्टवक्तेपणा आणि साध्या राहणीमानामुळे ओळखले जातात.…
Pune Accident

Pune Accident : कुटुंबाचा आधार हरपला ! भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 8, 2023 0
पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Accident) अंबेगाव तालुक्यातून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बेल्हे-जेजुरी महामार्गावर असलेल्या लाखनगावामध्ये हा भीषण…

‘पुणे-औरंगाबाद अंतर अवघ्या अडीच तासांत गाठणं होणार शक्य’

Posted by - July 14, 2022 0
औरंगाबाद: औरंगाबाद-पुणे या 268 किलोमीटरच्या विशेष महामार्गाचं काम सुरू होणार असून लवकरच सहा पदरी रस्ता सुरू होईल आणि त्याला पुणे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *